Salman Khan Comment On Divorce : कपिल शर्मा पुन्हा एकदा त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा तिसरा सीझन लवकरहक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपुर्वी या शोची घोषणा करण्यात आली. या नवीन सीझनमध्ये नवज्योत सिंह सिद्धू हेदेखील पाहायला मिळणार आहेत. नवज्योत सिंह सिद्धू जवळपास ५ वर्षांनी या शोमध्ये परीक्षक म्हणून येत आहेत.

कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात सलमानची हजेरी

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन या महिन्यात सुरू होणार आहे आणि चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या शोच्या आगामी भागाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यावरुन कपिल शर्माने होस्ट केलेल्या या शोचा पहिला भाग जबरदस्त असणार आहे. शोच्या आगामी सीझनच्या पहिल्या भागात अभिनेता सलमान खान येणार आहे.

घटस्फोटानंतरच्या पोटगीबद्दल सलमान खानने केलेलं वक्तव्य चर्चेत

या शो संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान खान घटस्फोट, लग्न आणि घटस्फोट झाल्यानंतरची पोटगी यावर बोलत आहे. या व्हिडीओमधून त्याने पती-पत्नीमधील नात्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. या व्हिडीओत तो असं म्हणत आहे की, “पूर्वीचे लोक कितीही वाद झाले तरी सगळं विसरून एकत्र राहायचे. एकमेकांना समजून घेण्याची त्यांची मानसिकता होती. आता लगेच घटस्फोट होतो. छोट्याशा गैरसमजातूनही घटस्फोट होतो आणि घटस्फोटानंतर ती अर्धे पैसे घेऊन निघून जाते.”

सलमान खानच्या व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

सलमान खानचं हे बोलणं ऐकून नवज्योत सिंह सिद्धू आणि अर्चना पूरण सिंह यांसह उपस्थित असलेले सर्वजण खूप हसतात. दरम्यान, सलमानने शोध्ये केलेलं हे वक्तव्य नक्की कोणत्या संदर्भात आहे? हे शोमध्येच पाहावं लागेल. पण त्याच्या या छोट्याश्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. त्याचे अनेक चाहते या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो तिसऱ्या सीझनमध्ये ‘हे’ कलाकार

कपिल शर्माच्या आगामी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनमध्ये नवज्योत सिंह सिद्धू, अर्चना पूरण सिंह आणि कपिल शर्मा व्यतिरिक्त, सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदासारखे विनोदी कलाकारदेखील दिसतील. या शोचा आगामी तिसरा सीझन येत्या २१ जून रोजी रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे. दर शनिवारी हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.