‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘ठिपक्यांची रांगोळी’. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका गेल्या वर्षी ऑफ एअर झाली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या, अमेय, मानसी अशी अनेक पात्र घराघरात पोहोचली होती. आज या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे. याच मालिकेतील एका अभिनेत्रीच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुमी म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान हिच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. गुंजन प्रधान असं नम्रताच्या बहिणीचं नाव आहे. नम्रताने गुंजन आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

हेही वाचा – स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

नम्रता प्रधानने बहिणीचा आणि होणाऱ्या जीजूचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आयुष्यातल्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा.” या फोटोमध्ये नम्रताची बहीण केशरी आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे. तर तिच्या होणारा नवरा पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी

नम्रता प्रधान इन्स्टाग्राम पोस्ट

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

दरम्यान, नम्रता प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती २०१८मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या ‘छत्रीवाली’ मालिकेत पहिल्यांदा पाहायला मिळाली होती. अभिनयाची पाटी कोरली असली तरी नम्रताला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. ही प्रमुख भूमिका या अभिनेत्रीने उत्तमरित्या साकारली. त्यामुळे अल्पावधीत नम्रता अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली.

हेही वाचा – १० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

त्यानंतर नम्रता प्रधान ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटात झळकली. मग ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेमुळे ती अधिक प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील तिची सुमी भूमिका चांगलीच हीट झाली. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेनंतर नम्रता प्रधान ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळाली. पण, ही मालिका अवघ्या तीन महिन्यात ऑफ एअर झाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thipkyanchi rangoli fame namrata pradhan sister gunjan pradhan will get marry pps