‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये अभिनेत्रीने अंजली पाठक ही प्रमुख भूमिका साकारली होती. मालिकेने निरोप घेतल्यावर अनेक वर्षे उलटून गेली तरी आजही अक्षयाला सर्वत्र पाठकबाई या नावाने देखील ओळखलं जातं. सध्या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकताच स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात शेअर केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षया देवधर या व्हिडीओमध्ये सांगते, “सध्या सर्वत्र कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) आणि ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नेमका उपाय काय? याबद्दल आपल्याला कायम प्रश्न पडतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारताने स्वतःची लस विकसित केली आहे. या लसीचं नाव एचपीव्ही असं आहे. याचे सध्या तीन डोस उपलब्ध आहेत आणि हे संपूर्ण डोस महिलांना पूर्ण करावे लागतात. मला हे सांगताना अतिशय खेद वाटतो की, या लसीकरणाबाबत मला काहीच माहिती नव्हती. काही महिलांमध्ये आजही याबाबत जागृती निर्माण झालेली नाही.”

हेही वाचा : सयाजी शिंदे : साताऱ्यात वॉचमनची नोकरी, टॉलीवूडचा ‘डॅशिंग व्हिलन’ ते सह्याद्रीला आपलंस करणारा वृक्षप्रेमी अभिनेता

अक्षया पुढे म्हणाला, “मला याबाबत माहिती मिळाल्यावर मी सर्वप्रथम हे डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मी याचा दुसरा डोस घेतला. जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. माझा व्हिडीओ जर कोणी पुरुष पाहत असतील तर तुमच्या आजूबाजूच्या महिला, मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा. या लसीकरणाबाबत कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद साधा. वयाच्या ९ व्या वर्षापासून ही लस मुली घेऊ शकतात. त्यामुळे कृपया याकडे गांभीर्याने पाहा आणि जास्तीत जास्त मुलींना याची माहिती द्या.”

हेही वाचा : सासूबाईनंतर अंकिता लोखंडेच्या आईचाही तिने सुशांतचे नाव घेण्यावर आक्षेप, विकी जैनच्या कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाल्या…

दरम्यान, या सामाजिक विषयावर व्हिडीओ शेअर केल्याबद्दल ऋतुजा बागवे, सुरुची अडारकर, हार्दिक जोशी यांच्यासह नेटकऱ्यांनी अक्षयाचं भरभरून कौतुक केलं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अक्षया नुकतीच ‘पिल्लू’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhyat jeev rangala fame akshaya deodhar shares health awareness about cervical cancer prevention sva 00