scorecardresearch

अक्षया देवधर

अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. अक्षयाचा जन्म १४ मे १९९४ रोजी झाला असून तिचे वय २९ वर्ष आहे. अक्षयाचे जन्म आणि शालेय शिक्षण पुण्यात झाले आहे. अक्षयाने तिचे शालेय शिक्षण अहिल्यादेवी हायस्कूलमधून पूर्ण केले, तर बीएमसीसीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अक्षया शाळेत असताना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असे. तिच्या कॉलेजच्या काळातही तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. तिने अमेय वाघसह ‘आयटम’ या नाटकातून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. तिने ‘बिनकामाचे संवाद’, ‘दर्शन’, ‘संगीत’, ‘मान-अपमान’सारख्या नाटकांमध्ये काम केले आहे.


२०११ मध्ये अक्षयाने ‘शाळा’ चित्रपटात ‘अक्का’ची भूमिका साकारून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २०१६ साली तिने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मराठी मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. या मालिकेतील तिचे ‘पाठक बाई’ हे शिक्षकेचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले.


मालिकेमध्ये अभिनेता हार्दिक जोशीसह अक्षयाने मुख्य भुमिका साकारली होती. प्रेक्षकांना ही जोडी प्रचंड आवडली. ऑनस्क्रीन राणादा व पाठकबाईची जोडीपासून ते खऱ्या आयुष्यातले नवरा-बायको झालेल्या या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. हार्दिक आणि अक्षया यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचा शाहीविवाह सोहळा पुण्यात पार पडला. हार्दिक आणि अक्षया यांचा लग्नसोहळा सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच अक्षयाची मंगळगौर पार पडली, तेव्हा ती पुन्हा चर्चेत आली होती. हार्दिकला डेट करण्यापूर्वी अभिनेता सुयश टिळक आणि अक्षया देवधर एकमेकांना डेट करत होते. पण, काही कारणास्तव त्यांनी सहमतीने एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.


Read More
hardeek joshi directly went to wife akshaya deodhar house for marriage permission
थेट अक्षयाच्या घरी जाऊन हार्दिक जोशीने घातली होती लग्नाची मागणी अन्…; जोडप्याने पहिल्यांदाच सांगितली लव्हस्टोरी

“माझ्या मुलाशी लग्न करशील का?”, ‘अशी’ आहे हार्दिक-अक्षयाची लव्हस्टोरी

akshaya deodhar shares health awareness about cervical cancer
Video : “गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर उपाय काय?” अक्षया देवधरने महिलांना केलं आवाहन; म्हणाली, “कृपया याकडे…”

अभिनेत्री अक्षया देवधरने महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगासंदर्भात दिली माहिती, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

akshaya deodhar aka pathak bai guest appearance in hardeek joshi jau bai gavat
जाऊ बाई गावात : मकरसंक्रातीला हार्दिक जोशीला मिळणार खास सरप्राईज! राणादाच्या शोमध्ये येणार पाठकबाई

मकरसंक्रातीला ‘जाऊ बाई गावात’ कार्यक्रमात येणार अक्षया देवधर, फोटो व्हायरल

hardeek joshi and akshaya deodhar
राणादा-पाठकबाईंच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अक्षया देवधर पोस्ट करत म्हणाली, “माझा नवरा…”

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

akshaya deodhar shares happy retirement post for her father
“तुम्ही भारतीय रेल्वेत ४० वर्ष…”, ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरचे वडील झाले सेवानिवृत्त! अभिनेत्री म्हणते, “आता…”

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम पाठकबाईंची वडिलांसाठी खास पोस्ट, म्हणाली…

tujhyat jeev rangala fame akshaya deodhar
9 Photos
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधर का करत नाहीये चित्रपट आणि मालिकांमध्ये काम? जाणून घ्या…

अक्षया देवधरने सध्या ‘या’ कारणामुळे थांबवली आहेत स्वतःची कामं

akshaya deodhar
“माझ्या सासूबाई खमक्या…” अक्षया देवधरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “या काळात…”

“तुला तुझ्या सासू आणि आईकडून कोणती शिकवण घ्यावीशी वाटते?” याबद्दल विचारण्यात आले.

hardeek joshi and akshaya deodhar
“गेल्या ७ वर्षांपासून…”, हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, “राणादा अन् पाठकबाई…”

हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

hardeek joshi and akshaya deodhar
“अक्षया मला आईसारखी ओरडते”, हार्दिक जोशीने केला बायकोबद्दल खुलासा म्हणाला, “किचनमध्ये लुडबूड…”

“अक्षया आणि माझी आई…”, अभिनेता हार्दिक जोशीचा खुलासा

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×