यशश्री मसूरकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने नाटक आणि एकांकिकेत काम करून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. छोट्या पडद्यावरील मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. ‘रंग बदलती ओढणी’, लाल इश्क, चंद्रगुप्त मौर्य, दो दिल बंधे एक डोरी से यासह अनेक मालिकांमध्ये काम करणारी यशश्री सध्या ‘दबंगी मुलगी आई रे आई’मध्ये दिसत आहे. ती रेडीओ जॉकीदेखील होती. ‘टुकटुक राणी’ या नावाने ती लोकप्रिय आहे. यशश्रीने नुकतंच प्रेमातील अपयशावर भाष्य केलं आहे. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिचं ब्रेकअप झालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इ-टाइम्स’च्या वृत्तानुसार, यशश्री म्हणाली, “मी एका माणसाच्या प्रेमात वेडी होते, तो इंडस्ट्रीमधलाच आहे पण अभिनेता नाही. आमचं नातं खूप घट्ट वाटत होतं आणि प्रत्येक मुलीप्रमाणे मीही लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं. पण दुर्दैवाने, मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात होते, त्याने मला फसवून माझं मन दुखावलं. ‘मला लग्न करायचं नाही, तुझ्याशी नाही आणि कुणाशीही नाही’ असं म्हणत त्याने नातं संपवलं.”

अभिनेत्रीने यशाच्या शिखरावर असताना केलं लग्न, तब्बल ३० वर्षे सहन केला पतीचा अत्याचार अन् २०१५ मध्ये…

पुढे ती म्हणाली, “मला सर्वात जास्त या गोष्टीचं दुःख झालं की जोपर्यंत तो माझे भावनिक शोषण करू शकत होता, तोपर्यंत तो माझ्यासोबत राहिला. कामाबद्दल तो संघर्ष करत असताना मी त्याला साथ दिली. जेव्हा त्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला धक्का बसला. पण हळूहळू मी माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवलं. मी स्वतःला विचारलं की ‘माझ्याशी असं वागण्याची एवढी ताकद मी त्याला का दिली?’ तसेच मी आता लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.”

“मी त्याच्याबरोबर बसून…”, घटस्फोटाच्या १३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायची इच्छा

यशश्रीला लग्न करायचं नसलं तरी तिला अजूनही प्रेमावर विश्वास आहे. “मला बंधनं आवडत नाहीत, त्यामुळे काही विशिष्ट अपेक्षांमध्ये स्वतःला बांधून ठेवण्यावर माझा विश्वास नाही. मला आता मुक्त वाटतंय. तसेच मला असं वाटतं की जर तुम्ही खरोखरच एखाद्याशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला लग्नाच्या टॅगची गरज आहे का? प्रेमात असताना आम्हा दोघांना कायदेशीर नाटक न करता बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य हवं असं मला वाटतं. ते स्वातंत्र्य असूनही जर दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं तर तेच खरं प्रेम आहे,” असं यशश्री म्हणते.

कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब, एकूण संपत्ती तब्बल ६००० कोटी रुपये

यशश्रीला सध्याच्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “मी आता कोणाशी तरी बोलत आहे, पण ती अजून फक्त सुरुवात आहे, ठोस असं काही नाही. माझ्यासाठी आदर्श जोडीदार तो आहे जो समान मूल्ये शेअर करतो, जो आपल्या जोडीदाराला प्रोत्साहन देतो, मदत करतो, शहरांपेक्षा जंगलांना प्राधान्य देतो. खरं तर तो एक कलाकार असावा. तो एक लेखक, चित्रकार, गायक किंवा अभिनेता असावा. माझ्यामते, चुकीच्या व्यक्तीबरोबर राहण्यापेक्षा अविवाहित राहणं चांगलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी माझ्या स्वतःबरोबर आनंदी राहायला शिकले आहे, त्यामुळे अशा आदर्श जोडीदाराची वाट बघण्यात माझी हरकत नाही.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashashri masurkar talks about failure in love she doesnt want to marry hrc