Zee Marathi Awards 2024 Winners List Part 1 and Part 2 : वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाचा ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा तब्बल दोन दिवस पार पडला. या सोहळ्यात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यंदा वाहिनीचं आणि यावर सुरू झालेली पहिली मालिका ‘आभाळमाया’चं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं. याशिवाय यंदाचा जीवनगौरव पुरस्कार लेखक व दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना प्रदान करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या वाहिनीवर सुरू असणाऱ्या लोकप्रिय जोड्यांचे रोमँटिक डान्स, विनोदी कलाकारांचा हटके डान्स, खलनायिकांचे परफॉर्मन्स, अक्षरा-अधिपतीचं रोमँटिक प्रपोजल, संकर्षण आणि मृण्मयी यांचं सुंदर सूत्रसंचालन, पुष्कर श्रोत्री आणि ओंकार भोजने यांचं स्किट, जुन्या मालिकांच्या आठवणी आणि आगामी मालिका ‘लक्ष्मी निवास’चा प्रोमो लाँच या सगळ्यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.

यंदा पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर पहिल्या भागाच्या विजेत्यांची यादी आता समोर आली आहे.

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – २ विजेते… ( Zee Marathi Awards )

  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री – दामिनी ( पारू )
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष – चंदन ( शिवा )
  • सर्वोत्कृष्ट बाबा – आकाश ( पुन्हा कर्तव्य आहे )
  • सर्वोत्कृष्ट आई – अहिल्यादेवी ( पारू )
  • सर्वोत्कृष्ट बहीण – तेजश्री, धनश्री, भाग्यश्री, राजश्री ( लाखात एक आमचा दादा )
  • सर्वोत्कृष्ट दादा – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )
  • सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
  • सर्वोत्कृष्ट खलनायक – डॅडी ( लाखात एक आमचा दादा )
  • विशेष सन्मान – मालिका आभाळमाया
  • सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – एजे आणि लीला ( नवरी मिळे हिटलरला )
  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय जोडी – अप्पी आणि अर्जुन ( अप्पी आमची कलेक्टर )
  • सर्वोत्कृष्ट नायिका – शिवा ( शिवा मालिका )
  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नायिका – अप्पी ( अप्पी आमची कलेक्टर )
  • सर्वोत्कृष्ट नायक – आदित्य ( पारू )
  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नायक – एजे ( नवरी मिळे हिटलरला )
  • लोकप्रिय कुटुंब – एजे कुटुंब ( नवरी मिळे हिटलरला )
  • सर्वोत्कृष्ट कुटुंब – किर्लोस्कर कुटुंब ( पारू )
  • लोकप्रिय मालिका – नवरी मिळे हिटलरला
  • सर्वोत्कृष्ट मालिका – पारू

हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार! ‘त्या’ फोटोत दिसली झलक

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – १ विजेते… ( Zee Marathi Awards )

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – दुर्गा ( नवरी मिळे हिटलरला )
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष – प्रितम ( पारू )
  • सर्वोत्कृष्ट मैत्री – शिवा, पाना गँग ( शिवा )
  • सर्वोत्कृष्ट आजी – बाई आजी ( शिवा )
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अमोल, गनी, बनी, चिनू-मनू, बटर
  • सर्वोत्कृष्ट सासरे – रामभाऊ ( शिवा )
  • सर्वोत्कृष्ट जावई – ए.जे. ( नवरी मिळे हिटलरला )
  • झी मराठी रायझिंग स्टार – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )
  • सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू ( पारू )
  • सर्वोत्कृष्ट मुलगा – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
  • सर्वोत्कृष्ट सून – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
  • सर्वोत्कृष्ट सासू – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
  • विशेष लक्षवेधी चेहरा – लीला ( नवरी मिळे हिटलरला )
  • ‘झी मराठी’ जीवनगौरव पुरस्कार – श्रीरंग गोडबोले
  • सर्वोत्कृष्ट शायनिंग पुरस्कार – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )
  • Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा पुरुष – आशू ( शिवा )
  • Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा स्त्री – पारू ( शिवा )
  • Zee 5 लोकप्रिय मालिका – शिवा
  • विशेष योगदान पुरस्कार – संदीप रसाळ

दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पारू’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या सगळ्या मालिकांमधील ( Zee Marathi Awards ) विजेत्या कलाकारांवर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi awards 2024 full winners list paaru serial won best serial award sva 00