Lakshmi Niwas upcoming twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत दररोज नवीन काहीतरी घडताना दिसते. कधी लक्ष्मी व श्रीनिवासची मुले एकमेकांशी भांडताना दिसतात. कधी त्यांच्यात फूट पडताना दिसते.
संतोष त्याच्या पैशांच्या लोभापायी कोणतीही पातळी गाठतो, सिंचनाच्या हट्टापुढे हरीश काहीही करू शकत नाही. तो स्वत:च्या पायांवर उभा राहून स्वत:ची आणि कुटुंबाची जबाबदारी घेत नाही.
कधी गाडे पाटलांच्या घरी भावनाला त्रास देण्यासाठी आजी कारस्थान करते, तिला वाईट शब्दांत बोलते. तर कधी जयंत जान्हवीला त्रास देतो, तिच्या अवतीभोवती असणाऱ्या, तिच्याशी बोलणाऱ्या, तिच्याप्रति माया, प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांना तो त्रास देतो, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो.
आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सिद्धू व भावना नवरात्री उत्सवात गेले आहेत. तिथे काही लोक गरबा खेळत असल्याचे दिसत आहे. सिद्धू व भावना एका ठिकाणी बसलेले असताना त्याचे मित्र त्याला चल म्हणून बोलावतात. त्यावर भावना त्याला विचारते की आता कुठे?
‘लक्ष्मी निवास’ मध्ये मोठा ट्विस्ट
सिद्धू तिला सांगतो की, रात्रभर ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी होतात. जसं की पोरं दाऊ पिऊन दंगा करतात. मुलींची छेडछाड काढतात, तर आम्ही गस्त घालतो आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी थांबवतो.
दुसरीकडे रवीदेखील त्या उत्सवाच्या ठिकाणी आला आहे. मनातल्या मनात म्हणतो की, जसा राजाचा जीव पोपटात अडकलेला असतो, तसा भावनाचा सिद्धूमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे आता सिद्धूला पिक्चरमधून काढलं पाहिजे. तो असे म्हणत असताना काही लोक सिद्धूला किडनॅप करीत असल्याचे दिसते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जयंत सचिनला सांगतो, “व्येंकीच अर्जुन आहे, हे मला बरंच नंतर कळलं आहे.” त्यावर सचिन म्हणतो, “अरे, तुझ्यामुळेच अर्जुनचा आवाज गेला आहे. तू त्याला बोअरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतं.” जयंत व सचिनचे हे बोलणे जान्हवी ऐकते. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘सिद्धूचा जीव धोक्यात’, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिका नव्या वळणावर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.