Lakshmi Niwas upcoming Twist: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मी व श्रीनिवास, सिद्धू व भावना, जयंत व जान्हवी, सिंचना व हरीश, वीणा व संतोष या आणि इतर सर्वच पात्रांच्या आयुष्यात सतत नवीन काहीतरी घडताना दिसते.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे सध्या लक्ष्मी व श्रीनिवास, सिद्धू व भावना आणि जयंत व जान्हवी हे गोव्याला गेले आहेत. जयंतची अनेक क्रूर सत्ये समजल्याने जान्हवीला त्रास होत आहे. जयंतमुळे तिच्या आजूबाजूच्या अनेकांच्या जीवावर बेतल्याचे समजल्यानंतर जान्हवी जयंतला धडा शिकवण्याचा निर्धार करते. जयंतने जान्हवीच्या आजीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिची आजी कोमात गेली.

जयंतला धडा शिकवण्यासाठी जान्हवी स्वत:ला त्याच्यापासून दूर करणार आहे. ती समुद्रात उडी मारणार आहे. आता जयंत हे सत्य तिच्या आई-वडिलांना सांगू शकणार का, तो नेमके काय करणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत आणि त्यांना पुढे काय होणार, ही उत्सुकता लागली आहे.

जान्हवी उचलणार टोकाचं पाऊल…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लक्ष्मी व श्रीनिवास एकमेकांपुढे त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. श्रीनिवास लक्ष्मीला म्हणतो, “लक्ष्मी आपल्या श्रीनिवास व भावनाचा संसार सुखात सुरू आहे. दोघीही खूप आनंदात आहेत, हे खूप बरं आहे.” श्रीनिवासचे बोलणे ऐकून लक्ष्मीला काहीतरी आठवते. ती त्याला म्हणते, “जयंतरावांना फोन लावून देता का? त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, लक्ष्मी जयंतशी फोनवर बोलते. ती त्याला म्हणते, “तुम्ही दोघांनी जमेल त्या देवळात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्या. जोडीनं नमस्कार करा. दोन दिवसांनी भाऊबीज आहे. त्यावेळी तुम्ही आणि जानू इथे असाल, तर बरं होईल.” लक्ष्मीचे बोलणे ऐकत असताना जयंतच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘जान्हवी सोडून गेल्याचं सत्य जयंत लक्ष्मीला सांगेल का?’, अशी कॅप्शन दिली आहे.

जान्हवी जयंतच्या प्रेमात पडली होती. त्याच्यासाठी ती अनेक गोष्टी करीत होती. पण, जयंत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचे विकृत रूप दाखवत होता. कधी दुधात झुरळ घालून ते दूध पिणे, इतरांसमोर ती गाणे गायली म्हणून तिला सतत गाणे गात राहायला सांगणे, तसेच तिच्या घरच्यांकडे तिने लक्ष दिले किंवा घरी गेल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष झाले, तर तिला चित्र-विचित्र शिक्षा देणे, जान्हवी जर कोणाबरोबर बोलली, तर त्या व्यक्तीला बेदम मारणे.

घरात कॅमेरे लावून ती काय करते, कोणाशी बोलते, ती त्याच्याशी खोटे तर बोलत नाही ना? यावर सतत लक्ष ठेवणे, तिला कपाटात कोंडून ठेवणे, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. मात्र, शेवटी आता जान्हवीने जयंतला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्रात उडी मारल्यानंतर त्यातून ती वाचू शकणार का, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.