Zee Marathi Laxmi Niwas New Serial : “स्वत:च्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट…लक्ष्मी निवास” काही दिवसांपूर्वीच अशा आशयाचा प्रोमो ‘झी मराठी’ वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या पहिल्या प्रोमोमध्ये जुन्या स्कूटवरून येणारं वयोवृद्ध जोडपं आणि त्यांच्या डोळ्यासमोर दिसणारं हक्काचं घर अशी मांडणी करण्यात आली होती. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेची ही पहिली झलक प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती आणि त्या दिवसापासून मालिकेत प्रमुख भूमिका कोण साकारणार याची चर्चा रंगू लागली. आता याच मालिकेतील प्रमुख कलाकारांचा एक पाठमोरा व्हिडीओ वाहिनीकडून शेअर करण्यात आला आहे. यावरून नेटकऱ्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये प्रत्येक वाहिनीवर नव्या मालिकांची नांदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’वर ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका सुरू झाली. आता त्या पाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका येणार आहे.

हेही वाचा : Video : ‘अमी जे तोमार’वर माधुरी-विद्याची जबरदस्त जुगलबंदी! ५७ वर्षीय ‘धकधक गर्ल’च्या दिलखेचक अदांनी सारेच झाले थक्क…

“तुम्हालाच भेटायला येतायेत, जोडीनं… कोण असतील हे बरं..? लिहा तुमचं उत्तर कमेंटमध्ये…” अशा आशयाचा एक व्हिडीओ झी मराठीने नुकताच शेअर केला आहे. यामध्ये वयोवृद्ध जोडपं स्कूटरवर बसलेलं दिसत आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये या दोघांचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. तरीही प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडत ही जोडी म्हणजे हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी आहेत हे ओळखलं आहे. या दोन दिग्गज कलाकारांनी एवढी वर्षे इंडस्ट्रीत काम केल्याने त्यांना ओळखणं अगदी सहज शक्य झाल्याचं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

‘झी मराठी’ची नवीन मालिका ‘लक्ष्मी निवास’

‘झी मराठी’ ( Zee Marathi ) वाहिनीवरील ही आगामी ‘लक्ष्मी निवास’ मालिका, ‘झी कन्नडा’ची टीआरपी टॉपर मालिका ‘लक्ष्मी निवासा’चा मराठी रिमेक आहे. ‘लक्ष्मी निवास’मध्ये प्रमुख भूमिकेत कोण झळकणार याचा खुलासा अद्याप वाहिनीकडून करण्यात आलेला नाही. मात्र, या पहिल्या प्रोमोला प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी व्हॉइस ओव्हर दिल्याचं अगदी प्रोमो ऐकल्यावर लगेच लक्षात येतं. त्यामुळे प्रमुख भूमिकेत त्या झळकणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.

हेही वाचा : “मुलाचं लग्न आज पार पडलं”, पृथ्वीक प्रतापसाठी भावाची खास पोस्ट; म्हणाला, “तुझा आणि प्राजक्ताचा…”

नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Zee Marathi Laxmi Niwas )

दरम्यान, या नुकसाच समोर आलेला नवीन व्हिडीओ पाहता अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी या ‘झी मराठी’वर ( Zee Marathi ) एकत्र झळकणार असल्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi laxmi niwas new promo netizens guesses lead actors sva 00