Prapti Redkar and Mrunmayee Gondhalekar: पडद्यावर दिसणारे कलाकार अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. अभिनयाबरोबरच ते त्यांच्यातील अनेक कलागुण प्रेक्षकांना दाखवत असतात. त्यामुळे या कलाकारांचा सोशल मीडियावरदेखील मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते.
‘झी मराठी अवॉर्ड २०२५’चा नामांकन सोहळा पार पडला. या सोहळ्यात झी मराठी वाहिनीवरील प्रदर्शित होणाऱ्या सर्वच मालिकांमधील कलाकार एका वेगळ्या अंदाजात सहभागी होताना दिसले. त्यांचा लूक लक्ष वेधून घेत होता. त्याबरोबरच या सोहळ्यातील काही खास क्षणदेखील पाहायला मिळाले.
सावली व तुळजाने धरला ठेका
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करीत असल्याचे पाहायला मिळते. त्यांचा हा डान्स लक्षवेधी ठरत आहे.
‘छबीदार छबी’ या गाण्यावर दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी ठेका धरला. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. हा डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत आहे. मृण्मयीने काळ्या रंगाचा, तर प्राप्तीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. त्यांच्या अभिनय तर उत्तम आहेच; पण त्या उत्तम डान्सही करतात, असे अनेकांनी कमेंट करीत लिहिले आहे.
मेघा धाडे म्हणाली…
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री मेघा धाडेने प्राप्तीचे कौतुक करत लिहिले, “आमची बाहुली बघा किती छान.” एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही दोघींनी खूप छान डान्स केला”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “मृण्मयी तू खूप चांगली अभिनेत्री आणि उत्तम डान्सर आहेस”, एका नेटकऱ्याने लिहिले, “सावली खूप छान”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
प्राप्ती रेडकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तिने सावली ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. तसेच, मालिकेतील सावली व सारंगची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.
मृण्मयी गोंधळेकर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत तुळजा या भूमिकेत दिसत आहे. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून वेळोवेळी कौतुक होताना दिसते. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानंतर अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मृण्मयी आणि प्राप्ती या दोन्ही अभिनेत्री अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करतात. काही वेळा त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधून सेटवर काय घडते, हे पाहायला मिळते; तर अनेकदा विनोदी रील्समधून या अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येतात.