Shiva Upcoming Promo: ‘शिवा’ मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. मीरा वेलणकर यांनी ही मालिका सोडल्याने मालिकेची चर्चा होताना दिसत होती. आता मीरा वेलणकर यांच्या जागी अभिनेत्री स्नेहा रायकर सीताईच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेते रमेश वाणी हे रामभाऊच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आता मालिकेतदेखील मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच किर्तीच्या नवऱ्याने सुहाने आशूविरुद्ध मोठे कारस्थान केले होते. अंजलीच्या मदतीने त्याला तुरुंगात टाकले होते. सुहासच्या सांगण्यावरुन आशूने जबरदस्ती केली आहे, असा खोटा आरोप अंजलीने त्याच्यावर लावला होता. मात्र, शिवाने कठीण परिस्थितीवर मात करत, आशूवर विश्वास ठेवत त्याला यातून बाहेर काढले. आता सुहासचे सत्यदेखील सर्वांसमोर येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सुहासचे सत्य सर्वांसमोर येणार
‘शिवा’ मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले की शिवा व आशू कुटुंबासह आनंद साजरा करत आहे. संपूर्ण कुटुंबासह ते डान्स करताना दिसतात. तितक्यात अंजली येते. तिला पाहताच सुहासला धक्का बसतो. तो तिला विचारतो की तू इथे काय करत आहेस? त्याच्यामागे आशू उभा असतो. तो त्याला म्हणतो, “काय जीजू घाबरलास का? ओळखतोस का तू तिला?”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की शिवा सुहासच्या कानाखाली देते. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सुहासचं पितळ उघडं पडणार”, अशी कॅप्शन दिली आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.
नेटकऱ्यांनी शिवाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “भारी एक नंबर.मला आवडलं”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “एकच नंबर शिवा”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “मस्त शिवा”, एका नेटकऱ्याने लिहिले, “सुहासच्या खूप छान कानाखाली मारली. लव्ह यू शिवा”, एका नेटकऱ्याने लिहिले, “सुहासला आता तरी माफ करू नका”, अशा कमेंट करीत चाहत्यांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.
आता सिताई व रामभाऊ त्यांच्या मुलीला म्हणजेच किर्ती व सुहासला माफ करणार का, शिवा व आशू काय करणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.