तमिळ सुपरस्टार थलपती विजय व अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा एक जुना चित्रपट सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. कमाल म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक नव्या चित्रपटांना मागे टाकेल इतकी कमाई केली आहे. २० वर्षानंतर पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘घिल्ली’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

१७ एप्रिल २००४ ला हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता २० वर्षांनीही चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. २० एप्रिल रोजी हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाने दोन दिवसांत साडेआठ कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.७५ कोटी व दुसऱ्या दिवशी ३.७५ कोटींचा गल्ला जमवला.

चाहती अचानक स्टेजवर आली, मिठी मारली, हाताचं चुंबन घेतलं अन्…; प्रसिद्ध गायकाने केलं असं काही की… पाहा VIDEO

‘सॅकनिल्क’ च्या वृत्तानुसार, २००४ मध्ये जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याने ४० कोटींहून जास्त कमाई केली होती. या चित्रपटाचं बजेट फक्त आठ कोटी रुपये होतं. हा चित्रपट २००३ मध्ये आलेल्या तेलुगू ब्लॉकबस्टर ‘ओक्कडू’चा रिमेक आहे, ज्यामध्ये महेश बाबू आणि भूमिका मुख्य भूमिकेत होते.

यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”

या चित्रपटात थलपती विजयसह त्रिशा कृष्णन, प्रकाश राज आणि आशिष विद्यार्थी यांसारखे अनेक कलाकार आहेत. चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात ८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी २० वर्षे जुन्या आणि मर्यादित चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी खूप चांगली आकडेवारी आहे.