कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याचा शो काही दिवसांपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या शोबाबत धक्कादायक खुलासा करत कपिल शर्मावर टीका देखील केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. काही रिपोर्ट्नुसार हा शो लवकरच बंद होणार आहे आणि आता यामागचं कारण समोर आलं आहे. कपिल शर्मानं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिल शर्मानं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या अमेरिका आणि कॅनडा ट्रीपबद्दल लिहिलं आहे. या ट्रीपमध्ये आपण खूप एन्जॉय करणार असल्याचंही त्यानं त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कपिल शर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कपिल शर्मा कामातून ब्रेक घेणार असल्यानं त्याचा शो बंद होणार असल्याचं अंदाज लावला जात आहे.

आणखी वाचा- शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, कपिलच्या काही जवळच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. कपिल शर्मा एका महिन्यासाठी यूएस ट्रीपवर जाणार आहे. त्यामुळे तो जून महिन्यापर्यंत बिझी आहे. या ट्रीपमुळे शोचं शुटिंग होणं शक्य नाही. त्यामुळे हा शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे हा काही दिवसांचा ब्रेक असल्याचं बोललं जात आहे. जेव्हा कपिल शर्मा भारतात परत येईल तेव्हा नव्यानं शोचं शूटिंग सुरू केलं जाणार आहे.

आणखी वाचा- “हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक”, ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्रींनी सुनावले

दरम्यान याआधी जानेवारी २०२१ मध्ये कपिल शर्माने काही काळासाठी या शोमधून ब्रेक घेतला होता. दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर कपिल शर्मानं काही काळासाठी या शोमधून ब्रेक घेत कुटुंबाला वेळ दिला होता. जेव्हा एका चाहत्यानं त्याला याबाबत विचारलं होतं. त्यावर त्यानं, ‘घरी माझी गरज होती. माझी पत्नी दुसऱ्यांदा आई झाली आहे तर मला माझ्या कुटुंबासोबत असणं गरजेच वाटतं त्यामुळे मी काही काळासाठी ब्रेक घेत आहे.’ असं सांगितलं होतं.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kapil sharma show goes off air soon know the real reason mrj