बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. १९९० साली काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांचं पलायन यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळताना दिसत आहे. मात्र एक गट असाही आहे जे या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे. एका विशिष्ट प्रकारचा विचार लोकांच्या मनावर ठासवण्याच्या हेतूनचं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचं या लोकांचं म्हणणं आहे. या चित्रपटामुळे मुस्लिमविरोधी विचारांना खतपणी घातलं जात असल्याचं बोललं जातंय. आता या चित्रपटाला अशाप्रकारे विरोध करणाऱ्यांवर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की त्यांनी एक प्रामाणिक चित्रपट तयार केला. ज्यात इतिहासाची एक काळी पण सत्य बाजू दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट दहशतवादाचा विरोध करतो. चित्रपट राजकारणावरून प्रेरित असण्याच्या आरोपांवर विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘मी हे दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो की राजकारण ही एक कला आहे.’ चित्रपटाच्या यशाबाबत पल्लवी जोशी म्हणाल्या, ‘हा चित्रपट व्यावसायिक दृष्टीकोनातून तयार करण्यात आला नव्हता. लोक आमच्याकडे येऊन चित्रपटाचं कौतुक करत आहेत. पुढच्या चित्रपटासाठी नव्या कल्पना शेअर करत आहेत. लोक या चित्रपटाशी जोडले जात आहेत हीच आमची पोचपावती आहे.’

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

आणखी वाचा- तब्बल ३ महिन्यांनंतर समोर आलं विकी- कतरिनाच्या लग्नाचं धक्कादायक सत्य, विवाहित असूनही…

चित्रपटाला विरोध करण्यांबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘मला वाटतं ही मोठी समाजसेवा आहे कारण तुम्ही वाईट आणि चांगल्याचे वर्गीकरण करत आहात. खरं तर, मी वर्गीकरण हा शब्दही वापरणार नाही. मी म्हणेन की या चित्रपटाद्वारे मानवतेचे समर्थन करणारे, मानवी हक्कांचे समर्थन करणारे आणि दहशतवादाच्या व्यवसायात असलेले लोक यांच्यात फरक आहे. जे दहशतवाद्यांचे समर्थन करत होते ते एका बाजूला आहेत आणि आपल्या बाजूला मानवतेचे समर्थन करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. हा चित्रपट २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि हा वर्गीकरण करणारा किंवा फूट पाडणारा चित्रपट आहे असे म्हणणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही. दहशतवाद्यांचे समर्थन करणारे लोक या चित्रपटावर टीका करत आहेत.’

आणखी वाचा- सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ; मॅनेजरला अपशब्द वापरल्याने मानहानीचा खटला दाखल

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, ‘हा चित्रपट राम आणि रावण यांच्यातील फरक दाखवतो.’ याशिवाय चित्रपटाला विरोध करणाऱ्यांबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘मी दहशतवाद्यांबद्दल का बोलू? त्यापेक्षा मी मानवतेचे समर्थन करणार्‍या लोकांना या दहशतवाद्यांना पराभूत करण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सांगेन.’