"लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी...", The Kashmir Files 'बिट्टा'ची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकर केले वक्तव्य | the kashmir files actor chinmay mandlekar who plays farooq malik bitta is getting hate messages from fans | Loksatta

“लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी…”, The Kashmir Files ‘बिट्टा’ची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने केले वक्तव्य

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.

“लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी…”, The Kashmir Files ‘बिट्टा’ची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने केले वक्तव्य
'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.

सध्या संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतर आहे. पण फक्त एकाच भूमिकेचा तिरस्कार केला जात आहे आणि तो म्हणजे फारुख मल्लिक बिट्टाच्या भूमिकेचा. हे भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर याने साकारली आहे. सोशल मीडियावर चित्रपट आणि त्यातील भूमिकांचे खूप कौतुक होत असताना चिन्मयला सतत द्वेषयुक्त मेसेज आणि कमेंट केल्या जात आहेत. याविषयी त्याची प्रतिक्रिया काय आहे याचा खुलासा चिन्मयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

चिन्मयने नुकतीच ‘आजतक’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने सोशल मीडियावर मिळणाऱ्या द्वेषयुक्त मेसेवर वक्तव्य केलं आहे. चिन्मय सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि शिवीगाळवर म्हणाला, “कुटुंब आणि मित्रपरिवार मला मेसेज करून माझ्या भूमिकेचा तिरस्कार वाटतो असे सांगत माझ्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण मेसेज करून, राग काढत शिवीगाळ करत आहेत. लोकांमधील तो राग मी जागृत करू शकलो याचा मला आनंद आहे. लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.”

आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?

आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video

चिन्मय चित्रपटाला मिळणाऱ्या कमाई विषयी म्हणाला, “चित्रपटाला इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. काश्मीर फाइल्सच्या सक्सेसबद्दल मी विचार करत होतो, की कदाचित दोन ते तीन आठवड्यांनंतर हा चित्रपट चित्रपटगृहात त्याची पकड मजबूत करेल. तर पहिल्या रात्रीपासूनच या चित्रपटाने कमालीची कमाई केली.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“द कश्मीर फाइल्समध्ये काहीही खोटं दाखवलेलं नाही”; चिन्मय मांडलेकरने मांडले रोखठोक मत

संबंधित बातम्या

“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर
‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर खुलासा; बिग बींना वाटते ‘या’ गोष्टीची भिती
दारु, सेक्स अन् लव्ह बाइट्स… खासगी आयुष्याबद्दल विजय देवरकोंडाचे धक्कादायक खुलासे
श्रीदेवीच्या लेकीला करायचंय ज्युनियर एनटीआरसोबत काम, म्हणाली “ही संधी…”
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द