मराठीतील बहुप्रतीक्षित सिक्वेलपट ‘झिम्मा २’च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी नुकतीच जाहीर केली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येलो  प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी आपल्या समाजमाध्यमांवर पोस्ट करत येत्या दिवाळी सुट्टीत २४ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘झिम्मा २’ प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या समाजमाध्यमांवर निर्मात्यांनी ‘‘ पुढच्या ट्रिपची तारीख ठरलीङ्घ आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ’’ अशा आशयाची पोस्ट करत ‘झिम्मा २’च्या प्रदर्शनाची आनंदवार्ता प्रेक्षकांना दिली आहे. कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ह्या चित्रपटात तगडय़ा आणि लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे ज्यात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांचा समावेश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या कलाकारांच्या टीममध्ये काही नवीन सदस्यही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे. करोना काळातून बाहेर पडल्यावर नव्याने चित्रपट व्यवसायाची घडी सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असताना ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि उत्साहाची एकच लाट राज्यभरातील चित्रपटगृहांमधून पाहायला मिळाली. या चित्रपटाने कठीण काळात प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणत १४ कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाने रचलेला इतिहास कायम चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहील.

आता चित्रपटाच्या सिक्वेलमधूनही हीच जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहे का याची उत्कंठा चित्रपट व्यावसायिकांप्रमाणेच चित्रपटप्रेमींच्या मनातही आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The makers have announced the release date of the much awaited marathi sequel zimma 2 amy