OG Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सध्या एक चित्रपट धुमाकूळ घालतोय. ‘दे कॉल हिम ओजी’ असं या सिनेमाचं नाव आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करत आहेत. परिणामी चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तेलुगू सुपरस्टार पवन कल्याणच्या या चित्रपटात इमरान हाश्मी व प्रियांका मोहन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी भारतात ‘ओजी’ने अंदाजे १८.५० कोटींची कमाई केली. गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांची आकडेवारी मिळून चित्रपटाचे एकूण कलेक्शन १२२ कोटी झाले आहे. आंध्र प्रदेश व तेलंगणात या चित्रपटाच्या तिकिटांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये एका तिकिटाची किंमत १००० आणि तेलंगणात ८०० रुपये आहेत. मुख्य म्हणजे ‘ओजी’ चित्रपटाने प्रीमियरमधून तब्बल २१ कोटींची कमाई केली.

OG चे एकूण कलेक्शन

पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारतात ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटाने १८.७५ कोटी रुपयांची कमाई केली. प्रिमियर व जगभरातील कलेक्शन असं मिळून ‘ओजी’ने पहिल्या दिवशी ६३.७५ कोटींची कमाई केली. दोन दिवसांचे कलेक्शन १७१ कोटी रुपये झाले. तिसऱ्या दिवसाची कमाई धरून एकूण कलेक्शन १२२ कोटी झाले आहे.

‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाई तेलुगू भाषेत केली आहे. त्यानंतर तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेत कलेक्शन केले. ओजीची शनिवारी तेलुगू भाषेत ४२.०८% ऑक्युपन्सी नोंदवली. आता आज रविवारी हा चित्रपट किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पाहा ट्रेलर

‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीतने केले आहे. डीव्हीव्ही एंटरटेनमेंट अंतर्गत डीव्हीव्ही दानय्या आणि कल्याण दसारी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. यात पवन कल्याण आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. तर, प्रियांका मोहन, अर्जुन दास, श्रीया रेड्डी आणि प्रकाश राज हे सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.

इमरान हाश्मीने ‘दे कॉल हिम ओजी’मधून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. यात त्याने पवन कल्याणच्या भावाची भूमिका केली आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर त्याने चांगली कामगिरी केली आहे. हा पवन कल्याणचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.