बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. नुकताच ट्विंकलने केलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टमध्ये तिने एका आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विंकल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती टेपने काही तरी मोजत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, तिने पांढऱ्या रंगाची शॉर्ट पँट आणि टी-शर्ट घातला आहे. या लूकमध्ये ती छान दिसत आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ मालिका येणार ओटीटीवर? लेखकाने केला खुलासा

हा फोटो शेअर करत तिने गेल्या काही दिवसांपासून एका आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले आहे. ते वाचून चाहत्यांना धक्काच बसला आहे. त्यासोबत ट्विंकलने चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील लाजिरवाणे क्षण शेअर करण्यास सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर ट्विंकलची ही पोस्ट चर्चेत आहे.

‘ते म्हणतात दोनदा मोजा आणि एकदा कापा. हे मी लिखाण करत असताना करते. पण जेव्हा मी एखादी गोष्ट बोलते तेव्हा ती करावी अशी माझी इच्छा असते. विचारपूर्वक न बोलण्याच्या आजारामुळे मला अनेकदा संकटांचा सामना करावा लागतो आणि हे खूप लज्जास्पद आहे. सतत बडबड करणाऱ्या सर्वांनी त्यांचे वाईट अनुभव कमेंट्समध्ये सांगा किंवा ते खूप लाजिरवाणे असल्यास #FootInTheMouth मध्ये टाका’ या आशयाचे कॅप्शन ट्विंकलने केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twinkle khanna says she is suffering from foot in the mouth disease avb