“…आणि मी त्यांना जे आवडतं तेच दिलं “, बोल्ड लूकमुळे चर्चेत आलेल्या उर्फीचं ट्रोलिंगवर उत्तर

कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने उर्फी जावेद चर्चेत आली होती. हटके फॅशनमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल देखील केलं होतं.

urfi-javed-troll-reply
(Photo-Instagram@urf7i)

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यापासूनच अभिनेत्री उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आली आहे. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने उर्फी जावेद चर्चेत आली होती. तिच्या या हटके फॅशनमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल देखील केलं होतं. वेळेवेळी कपड्यांमुळे ट्रोल होणाऱ्या उर्फीने नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्फीने तिला लोकांना काय वाटतं याची पर्वा नसल्याचा खुलासा केला आहे. फ्री प्रेस जनरलशीबोलताना उर्फी म्हणाली, ” माझा एअरपोर्टवरील लूक सगळ्याचं लक्ष केंद्रीत करून घेईल याची मला अपेक्षा नव्हती. मला जे कपडे परिधान करण्यास आवडतात असेच कपडे मी तयार करून घेते आणि परिधान करते. मला वाटतं मी जे परिधान करते त्यामुळे इतरांना त्रास करून घेण्याची गरज नाही. माझ्या कपड्यांपेक्षा माझ्यामध्ये बरचं काही आहे.” तर ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंटचा फरक पडत नसल्याचं उर्फी यावेळी म्हणाली.

“होय ते थोडं वेदनादायी होतं”, समांथापासून विभक्त होणाच्या चर्चांवर नागा चैतन्यने व्यक्त केल्या भावना

पुढे उर्फी म्हणाली, “मला फक्त एवढच सांगायचंय की लोकांना ट्रोलिंग आवडतं आणि मी त्यांना जे आवडतं तेच दिलं कारण मी त्यांच्यावर प्रेम करते. सुरुवातीला, माझी चूक आहे का? असा प्रश्न मला पडला. मात्र आता मला या गोष्टींचा फरक पडत नाही. मला लक्षात आलं आहे की मी काहीही केलं किंवा पोस्ट केलं तरी लोक चर्चा करणारच”

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदला तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.एअरपोर्टवर ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने ती सर्वात आधी चर्चेत आली होती. त्यानंतर बोल्ड लूक आणि बॅकसेल टॉपमुळे देखील उर्फीने नेटकऱ्यांची टीका ओढावून घेतली होती. तर नुकत्याच परिधान केलेल्या बॅकलेस ड्रेसमुळे देखील नेटकऱ्यांनी उर्फीवर तिने हिजाबचा अपमान केल्याची टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Urfi javed replies online trolling said nasty comments dont bother her anymore kpw

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी