अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या ग्लमरस लूकमुळे कायम चर्चेत असते. आरस्पानी सौंदर्य लाभलेली उर्वशी रौतेला सोशल मीडियवर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. उर्वशी तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूपच लक्ष देताना दिसते. सोशल मीडियावर उर्वशी अनेकदा जिममधील वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत असते. उर्वशीने गेल्या काही दिवसांमध्ये जिममधील काही हटके वर्कआउटचे व्हिडीओ शेअर केल्याने देखील ती चांगलीच चर्चेत होती.
नुकताच उर्वशीने जिममधील वर्कआउटचा तिचा एक व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केलाय. वर्कआउट करतानाही उर्वशीने आपला ग्लॅमरस लूक कायम ठेवल्याचं यात पाहायला मिळतं. उर्वशीने गोल्डन कलरची स्पोर्टस् ब्रा आणि शिमरी जिम पॅन्ट परिधान केल्याचं दिसतंय. उर्वशीचा हा ग्लॅमरस वर्कआउट लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या व्हिडीओत उर्वशी युनिक वर्कआउट करताना दिसून येतेय. ५० किलोचे वेटस् हाता घेऊन उर्वशी बॅलेन्स करत आहे. यावेळी तिने तिचा एक पाय बोसू बॉलवर ठेवलाय. उर्वशी अगदी सहजपणे हा वर्कआउट करताना दिसतेय. उर्वशीचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.
हे देखील वाचा: “घरात नाही पाणी…” ; बिग बींच्या घरात पाण्याची समस्या चाहत्यांना म्हणाले…
अनेक नेटकऱ्यांनी फायरचे इमोजी पोस्ट करत उर्वशीच्या व्हिडीओला पसंती दिलीय तसचं तिच्या वर्कआउटचं कौतुक केलंय. तर काही नेटकऱ्यांनी मात्र उर्वशीला तिच्या वर्कआउटवरून ट्रोल केलंय. उर्वशीने खोटे वेटस् उचलले असल्याचं अनेक नेटकरी म्हणाले आहेत. या आधीदेखील उर्वशीने वर्कआउटचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात ती अत्यंत कठीण असे वर्कआउट करताना दिसत आहे.