‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशलने त्याच्या अभिनय कौशल्याने अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केलीय. येत्या काळातही विकी वेगवेगळ्या हटके भूमिकांमधुन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये विकी कौशलने ९ वर्षांचा प्रवास पूर्ण केलाय. याच निमित्ताने विकीने त्याच्या पहिल्या ऑडिशनचा एक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलाय. या फोटोत विकी कौशल इतका वेगळा दिसतोय की त्याला ओळखणंही मुश्किल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात विकीने त्याचा हा फोटो ९ वर्ष जुना असल्याचं म्हंटलं आहे. विकीच्या पहिल्या ऑडिशनचा हा फोटो आहे. हा फोटो १० जुलै २०१२ सालातील आहे. हा फोटो शेअर करत विकीने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.मात्र या फोटोत विकी अगदीच लहान दिसतोय त्यामुळे हा फोटो पाहून विकीचे चाहते मात्र थक्क झाले आहेत.

(Photo-instagram@vickykaushal09)

हे देखील वाचा: Video: “ब्लाउजच घातलं नाही तर मास्क कुठून आणणार”; ‘त्या’ ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

या फोटोच्या कॅप्शनमध्ये विकी म्हणाला, “९ वर्षांपूर्वी.. आभार..” या फोटोत विकीने पांढऱ्या रंगाचं टीशर्ट परिधान केल्याचं दिसतंय. तर त्याच्या हातात एक बोर्ड असून त्यावर त्याची माहिती आहे. ऑडिशनवेळीचा हा फोटो आहे.

विकी कौशल सोशल मीडियावर चांगला सक्रिय असतो. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. विकीने २०१५ सालात आलेल्या ‘मसान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘संजू’, ‘राजी’, ‘उरी’, ‘मनमर्जिया’, अशा सिनेमांमधून महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकला. तर येत्या काळात विकी ‘इमोर्टल ऑफ अश्वत्थामा’, ‘सरदार उधम सिंह’ आणि ‘तख्त’ या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vicky kaushal share 9 years old photo from his first audition goes viral kpw