IIFA पुरस्कार सोहळ्यात एकटाच दिसला विकी कौशल, वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणाला "कतरिना खूप..." | Vicky Kaushal Who Arrived Alone At IIFA Awards 2022 Revealed About Married Life with katrina kaif nrp 97 | Loksatta

IIFA पुरस्कार सोहळ्यात एकटाच दिसला विकी कौशल, वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणाला “कतरिना खूप…”

मात्र या पुरस्कार सोहळ्यात तो एकटाच दिसला.

IIFA पुरस्कार सोहळ्यात एकटाच दिसला विकी कौशल, वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणाला “कतरिना खूप…”

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात त्याने अभिनेत्री कतरिना कैफसोबत लगीनगाठ बांधली. ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या IIFA पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलने एकट्यानेच हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात तो एकटाच दिसला. त्यामुळे अनेकांनी त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे डिसेंबर २०२१ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्यापासूनच ही जोडी सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत होती. ९ डिसेंबर २०२१ रोजी या दोघांनी राजस्थानच्या सिक्स सेंस फोर्टमध्ये लग्न केलं. नुकतंच विकी हा IIFA पुरस्कार सोहळ्यासाठी दाखल झाला होता. यावेळी त्याला वैवाहिक आयुष्य कसे सुरु आहे? असा प्रश्न विचारण्यात आला.

“मी गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी चित्रपट पाहिलेले नाहीत कारण…”, अशोक सराफ यांनी सांगितले सिनेसृष्टीतील धक्कादायक सत्य

त्यावर त्याने मजेशीर पद्धतीने उत्तर दिले. “आमचे आयुष्य खूप छान चालले आहे. खूप जास्त आरामदायक आणि शांततेत. कतरिना खूप चांगली आहे. मला तिची खूप आठवण येते. पण मला अशी आशा आहे की, पुढच्या वर्षी आम्ही आयफा पुरस्कार सोहळ्यात एकत्र येऊ”, असे विकी कौशल म्हणाला.

दुबईतील अबुधाबी येथे झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यातील १२ श्रेणीतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात अभिनेता विकी कौशलला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अभिनेत्री क्रिती सेनॉन हिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

उषा नाडकर्णी यांना सांस्कृतिक कलादर्पणचा ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ जाहीर!

दरम्यान विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये शाही थाटात पार पडला. ते दोघेही ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. पण हा संपूर्ण सोहळा ७ ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या लग्नात कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. या दोघांच्या लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
प्रेक्षकांच्या प्रेमाने मला आजही बळ मिळते!; ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची भावना; पंच्याहत्तरीनिमित्ताने सत्कार 

संबंधित बातम्या

मुंबईः वेबमालिकेच्या नावाखाली अश्लील चित्रीकरण; अभिनेता-दिग्दर्शकाला अटक
“माकडांसारखे उड्या मारणारे…” प्रेग्नंन्सी फोटोशूटमुळे ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
“मुलीला भेटू देत नाही…” सुष्मिता सेनच्या भावाचा पत्नीवर गंभीर आरोप, चारू असोपाने दिलं स्पष्टीकरण
“बाळासाहेब ठाकरेंमुळेच आज मी…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा मोठा खुलासा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
महाराष्ट्र तोडण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होतोय; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता भाजपावर हल्ला
Video : राणादाने केला सरप्राईज डान्स, पाठकबाईंनी पाहताच क्षणी जोडले हात
पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…
तूपाचे सेवन ‘या’ ५ आजारांमध्ये ठरते विषासमान; तज्ज्ञांकडून जाणून घ्या तूप कोणी खावे आणि कोणी नाही
विश्लेषण : आपल्या देशात किती प्रकारच्या बँका आहेत? त्यांचे काम कसे चालते?