बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बऱ्याच वेळा त्याच्या सहकलाकारांच्या अनेक गोष्टी सांगतो. एकदा सलमानने त्याचा चांगला मित्र आणि सहकलाकार अभिनेता आमिर खानच्या अफेअरवर वक्तव्य केलं होतं.
सलमान आणि आमिरने फक्त चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं नाही तर ते चांगले मित्र देखील आहेत. सलमानची एक जूनी मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. “आमिर खानच्या अफेयर्स बद्दल ज्या अफवा चालू आहेत, त्यात काही तथ्य आहे का?” असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. “त्या अफवा आमिरच्या बाबतीत नाहीत, तर त्या माझ्या बाबतीत आहेत. आमिरची इमेज खूपचं क्लीन आहे. बहुधा तो विवाहित असल्यामुळे आहे. तो प्रत्येक वेळी एकचं म्हणत असतो मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. आणि यामुळेच त्याचा बचाव होतो,” असं सलमान म्हणतो. हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं की हा व्हिडीओ फार जूना आहे.
सलमान आणि आमिरने ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात सलमान आणि आमिर यांच्या सोबत करिश्मा कपूर आणि रविना टंडन मुख्य भूमिकेत आहेत.
दरम्यान, सलमानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, आमिरचा ‘लाल सिंग चढ्ढा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.