while promotion of ps-1 film tamil star vikram said we have to proud that we are indians spg 93 | PS-I चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दाक्षिणात्य स्टार विक्रम म्हणाला, " आपण भारतीय आहोत आपल्याला.. " | Loksatta

PS-I चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दाक्षिणात्य स्टार विक्रम म्हणाला, ” आपण भारतीय आहोत आपल्याला.. “

या चित्रपटापूर्वी ऐश्वर्या राय आणि मणिरत्नम यांनी ‘गुरु’, ‘रावण’ आणि ‘इरुवर’ असे चित्रपट एकत्र केले होते.

PS-I चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दाक्षिणात्य स्टार विक्रम म्हणाला, ” आपण भारतीय आहोत आपल्याला.. “
actor talking about indian culture

दाक्षिणात्य चित्रपटांनी गेल्या काही वर्षात भारतीय रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘बाहुबली’ चित्रपटापासून ते नुकताच येऊन गेलेला ‘केजीएफ’, ‘पुष्पा’ हे चित्रपट असो , हिंदी चित्रपटांपेक्षा या चित्रपटांनी जास्त कमाई केली आहे. आता आणखीन एक बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटली येत आहे. मणी रत्नम हे दक्षिणेतील हे प्रख्यात दिग्दर्शक, ‘रोजा’, ‘बॉम्बे’, ‘दिलसे’ सारखे चित्रपट त्यांनी बनवले आहेत. आता त्यांचा ‘पोन्नियन सेल्वन (‘PS-I’)हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकार असणार आहेत.

या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. चित्रपटातील कलाकार विक्रम प्रमोशन दरम्यान असं म्हणाला की, ‘मला एका व्यक्तीने खूप छान सांगितलं त्याच असं म्हणणं होत की आपण अशा एका इमारतीचं कौतुक करतो जी धड उभी राहू शकत नाही, एका बाजूला झुकलेली असते. मात्र आपल्याकडे पुरातन मंदिर आजही दिमाखात उभी आहेत ज्यात कोणतेही प्लास्टर वापरलेले नाही. त्याकाळात कोणतेही मशीन, अत्याधुनिक सामुग्री नव्हती. मोठमोठाले दगड हे हत्ती माणसांच्या साहाय्याने ओढले जात होते. तेव्हा ६ भूकंप येऊन गेले होते तरी मंदिरांना कोणताही धक्का बसू शकला नाही. मंदिराच्या बाहेर मोठी भिंत बांधत आतमध्ये ६ फूट जागा सोडून एखादे मंदिर बांधत जेणेकरून भूकंप आला तरी आतल्या इमारतीला इजा पोहचत नाही. त्याकाळात राजाने ५००० धरणं बांधली, निवडणुका घेतल्या, मोफत रुग्णालय बांधली, लोकांना मदत केली. हे सगळं ९व्या शतकात घडलं होत’. पत्रकारांच्या प्रश्नावर तो म्हणाला, ‘तुम्ही आज अमेरिका महासत्तेबद्दल बोलत आहात अमेरिकरेचा शोध ५०० वर्षानंतर लागला आहे त्याच्याआधीच आपल्याकडे जगातील एक नंबरचे नौदल होते. बाली, मलेशिया थेट चीन पर्यंत व्यापार चाले. त्यामुळे आपण किती प्रगल्भ होतो, आपण किती अत्याधुनिक होतो, आपली संस्कृती किती महान होती याबद्दल थोडा विचार करा. हे फक्त उत्तर, भारत दक्षिण भारतापुरते नसून आपण सगळे भारतीय एक आहोत याचा आपल्याला अभिमान हवा’.

शरद पोंक्षे यांनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकादरम्यानचा ‘तो’ किस्सा, म्हणाले ‘जेव्हा प्रेक्षक म्हणाले…”

‘PS-I’ दोन भागांमध्ये बनवला जात आहे, जो कल्कीच्या या लेखकाच्या पुस्तकावर आधारित आहे. दक्षिण भारतात दीर्घकाळ राज्य करणाऱ्या चोल साम्राज्याची ही कथा आहे. ‘PS-I’ ३० सप्टेंबर रोजी पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. त्याचा ट्रेलरही पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘पोनियान सेल्वन-I’च्या हिंदी ट्रेलरला अभिनेता अनिल कपूरने आवाज दिला आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या राय व्यतिरिक्त दक्षिणेकडील चित्रपट स्टार विक्रमसह इतर अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच हा यूट्यूबवर हिट झाला आहे. ऐश्वर्या राय बच्चन राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तब्बल ४ वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटापूर्वी ऐश्वर्या राय आणि मणिरत्नम यांनी ‘गुरु’, ‘रावण’ आणि ‘इरुवर’ असे चित्रपट एकत्र केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सुपरस्टार अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

संबंधित बातम्या

“सावरकरांच्या सल्ल्यानुसारच….”; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य
“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…” जितेंद्र आव्हाडांची अक्षय कुमारच्या लूकवर संतप्त प्रतिक्रिया
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“मला संवाद बोलताना…” चित्रपटात अभिनय न करण्याबद्दल मलायकाने केले स्पष्ट वक्तव्य
‘विजय दिनानाथ चौहान…’, अमिताभ यांनी शेअर केला ‘हा’ थ्रोबॅक फोटो

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
“…म्हणूनच आम्ही अलिबागमध्ये घर खरेदी केले” रणवीर सिंगने केला खुलासा
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!
“बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगावं की…”; सामाजिक वातावरण बिघडतंय म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
उघड्या मॅनहोलची समस्या : अनुचित प्रकार घडल्यास महानगरपालिकेला जबाबदार धरणार; उच्च न्यायालयानचा इशारा