अणूबॉम्बचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा जे रॉबर्ट ओपनहायमर यांची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. नोलनच्या या चित्रपटाची चर्चा खूप आधीपासून सुरू होती. शिवाय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरही याची बरीच चर्चा झाली. नोलनचे चाहते आणि चित्रपटरसिक आतुरतेने वाट बघत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनने या चित्रपटात एकही व्हीएफएक्स किंवा सीजीआय शॉट नसल्याचं सांगून लोकांना आश्चर्यचकित केलं. एकाहून एक सरस आणि लोकांच्या डोक्याला खाद्य पुरवणारे चित्रपट देण्यासाठी क्रिस्तोफर नोलन ओळखला जातो. एवढे जबरदस्त चित्रपट देणारा दिग्दर्शक स्वतःला मात्र या ग्लॅमरपासून दूर ठेवून असतो, इतकंच नव्हे तर नोलन कधीच स्मार्टफोन त्याच्याबरोबर बाळगत नाही.

आणखी वाचा : आई-वडिलांप्रमाणेच अभिषेक बच्चनही खरंच राजकारणात येणार का? बातम्यांमागील सत्य आलं समोर

मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान त्याने स्मार्टफोन न बाळगण्याबद्दल भाष्य केलं होतं. इतकंच नव्हे तर आपल्या चित्रपटाची स्क्रिप्टसुद्धा नोलन अशाच कम्प्युटरवर लिहितो ज्याला इंटरनेट कनेक्शन नाही. इंटरनेटमुळे त्याचं लक्ष विचलित होतं असं त्याचं म्हणणं आहे. २०२० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नोलन म्हणाला, “मी जे काम करतो, जे लिहितो ते सगळं स्मार्टफोनवर करणं मला शक्य नाही. मी तंत्रज्ञानापासून बराच लांब पळतो यासाठी मला माझी मुलंही बरंच बोलतात.”

पुढे नोलन म्हणाला, “माझं लक्ष सहज विचलित होतं त्यामुळे जेव्हा मी मोकळा असतो तेव्हासुद्धा मी इंटरनेट जास्त वापरायचं टाळतो. इतर लोक त्यांच्या फावल्या वेळात इंटरनेटवर जे करतात त्या वेळात मी स्वतःच्या कल्पकतेतून चांगल्या गोष्टी तयार करता येतील याकडे लक्ष देतो. याचा मलाच जास्त फायदा होतो.” २०२० च्या ‘टेनेट’ नंतर आता नोलनच्या या ‘ओपनहायमर’ची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता किलियन मर्फी साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why oppenheimer director christopher nolan doesnt keep smartphone avn