बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. आपल्या आई वडिलांप्रमाणेच अभिनयाबरोबरच अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशी बातमी नुकतीच समोर आली होती. यामागील सत्य आता समोर आलं आहे. राजकारणात अभिषेक बच्चनच्या राजकारणातील एन्ट्रीबद्दल सत्य समोर आलं आहे.

मीडिया रीपोर्टनुसार आपल्या आईप्रमाणेच अभिषेक बच्चन समाजवादी पार्टीत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. ‘इ-टाईम्स’च्या वृत्तानुसार या बातमीमध्ये काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : शाहरुखने भेट म्हणून दिलेल्या लॅपटॉपला आमिर खानने पाच वर्षं हातही लावला नव्हता; अभिनेत्याने सांगितलं कारण

अभिषेक बच्चन समाजवादी पक्षात सहभागी होणार असून २०२३ मध्ये अलाहबादमधून निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याची जोरदार चर्चा होती. अभिषेकच्या जवळच्या सूत्रांनी या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. अद्याप अभिषेकचा असा कोणताही मनसुबा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय अभिषेकच्या एका जुन्या मुलाखतीमध्येही त्याने यावर उत्तर दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१३ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राजकारणात येण्याबद्दल अभिषेक म्हणाला होता की तो एखाद्या राजकीय नेत्याची भूमिका अत्यंत उत्तमरीत्या साकारू शकेल, पण तो राजकारणात मात्र कधीच येणार नाही. अभिषेकचे वडील म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये अभिनयातून ब्रेक घेऊन राजकारणात नशीब आजमावलं होतं. तर अभिषेकची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत.