तीन महिने उलटूनही प्रियंका चोप्राच्या आईने अद्याप पाहिला नाही नातीचा चेहरा, म्हणाल्या "सध्या ती..." | Why Priyanka Chopra Mother Madhu Chopra Has Not Seen Her Granddaughter Face Yet She Self Explained The Reason nrp 97 | Loksatta

तीन महिने उलटूनही प्रियंका चोप्राच्या आईने अद्याप पाहिला नाही नातीचा चेहरा, म्हणाल्या “सध्या ती…”

प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी नुकतंच मुलीसह नातीबद्दल भाष्य केले.

तीन महिने उलटूनही प्रियंका चोप्राच्या आईने अद्याप पाहिला नाही नातीचा चेहरा, म्हणाल्या “सध्या ती…”

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. यामुळे तिचे चाहते आनंदित असल्याचे पाहायला मिळत आहे. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांका ही सध्या मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी नुकतंच मुलीसह नातीबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी नातीबद्दल विविध खुलासेही केले.

ई टाइम्स लाइफस्टाइलने एका लाइव्ह सेशनचे आयोजन केले होते. या दरम्यान मधू चोप्रा यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना प्रियांकाची मुलगी आणि नात याबद्दलही विचारण्यात आले. यादरम्यान मधू चोप्रा म्हणाल्या, “मी अद्याप माझ्या छोट्या नातीला भेटलेली नाही. पण सध्या प्रियांका ही तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. ती यामुळे सर्वात जास्त खूश आहे. तिच्या कुटुंबात आलेल्या या नव्या बदलामुळे ती सर्वाधिक आनंदी आहे.”

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

“मी माझ्या नातीला अद्याप पाहिलेले नाही. मी भारतात आहे आणि ती तिकडे लॉस एंजेलिसमध्ये. आम्ही कधीकधी व्हिडीओ कॉलवर बोलतो. पण त्या दोघीही फार आनंदात आहेत. मी सध्या तरी तुम्हाला एवढेच सांगू शकतो. पण कदाचित जेव्हा मी तिकडे जाईन, त्या दोघींना भेटेन. तेव्हा मी याबद्दल अजून चांगले उत्तर देऊ शकते असं मला वाटतं”, असेही मधू चोप्रा म्हणाल्या.

मग निक आणि प्रियांका लवकरच आपल्या मुलीसह भारतात येतील अशी अपेक्षा आम्ही करु शकतो का? असा प्रश्न यावेळी मधू चोप्रांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “माझी तर नेहमी ही अपेक्षा असते. हा तिचा देश आहे, ती कधीही येऊ शकते. पण जेव्हापासून मी आजी झाल्याबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून मी फार उत्सुक आहे. मी फार दिवसांपासून ते तिघेही भारतात यावेत याची वाट पाहत आहे.”

प्रियांका चोप्राला आई झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिला प्रेमळ सल्ला, म्हणाली “आता रात्री…”

“माझ्या आयुष्यात घडलेल्या आनंदाच्या गोष्टींमधील ही सर्वात आनंदाची बाब आहे. मी याबद्दल शब्दात काहीही व्यक्त करु शकत नाही. पण मी गेल्या अनेक महिन्यांपासून असे काहीतरी होईल याची अपेक्षा करत आहे. मी आता आजी झाली आहे आणि त्याचा आनंद मी लपवू शकत नाही. विशेष म्हणजे मी आता प्रियांकाबद्दल कमी आणि नातीबद्दल जास्त विचार करत असते”, असेही मधू चोप्रांनी सांगितले.

दरम्यान प्रियांका चोप्राने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे” असे प्रियांकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. त्यानंतर प्रियांका पहिल्यांदा एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवर झळकली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2022 at 09:14 IST
Next Story
Oscar 2022: “विल स्मिथला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले होते”, निर्मात्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला “मी ख्रिस रॉकसोबत…”