Jaideep Ahlawat opened up about his childhood eating habits : कलाकार कायम लाईमलाइटमध्ये राहण्यासाठी फिटनेसकडे खूप लक्ष देतात. त्यांच्या बॉडीमध्ये होणारे बदल हे त्यांच्या करिअरसाठी फार महत्त्वाचे असतात. कधी त्यांना बॉडी बनवावी लागते, तर कधी वजन कमी किंवा जास्त करावं लागतं. त्यासाठी अनेकदा सेलिब्रिटी अशा टाईपचे डाएट फॉलो करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो.

बॉलीवूडमधील कलाकार स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. स्क्रीनवर चांगलं दिसण्यासाठी हे कलाकार प्रचंड मेहनत करताना दिसतात. बॉलीवूडमधील अशाच एका कलाकारानं त्याच्या डाएटबद्दल सांगितले आहे.

अभिनेता जयदीप अहलावत शेवटचा सैफ अली खानबरोबर ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात दिसला होता. त्याआधी तो ‘पाताल लोक सीझन २’मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने हथौडा त्यागीची भूमिका साकारली होती.

जयदीप अहलावत त्याच्या अभिनयासाठी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. आता एका मुलाखतीत त्यानं त्याच्या खाण्याच्या सवयींबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला की, तो चांगलं खातो आणि त्याचं वजन नियंत्रणात ठेवतो. जयदीप अहलावतनं असंही उघड केलं की, काही काळापूर्वी तो दररोज ४० रोट्या खात असे आणि १.५ लिटर दूध पित असे; पण तरीदेखील त्याचं वजन वाढलं नाही.

जयदीप अहलावतनं ‘खाने में क्या है’ या यूट्यूब चॅनेलवर कुणाल विजयकरशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या बालपणीच्या खाण्याच्या सवयींबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याने त्याच्या जीवनशैलीचा उल्लेख केला, ज्यामुळे तो तंदुरुस्त आहे. अभिनेत्याने हरियाणातील एका गावात घालवलेल्या त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले आणि त्याला खूप भूक लागायची; पण त्याची दिनचर्या अशी होती की, त्याने कितीही खाल्ले तरी सर्व काही संतुलित होते.

जयदीप अहलावत ४० रोट्या खात असे

जयदीप अहलावत म्हणाला, “२००८ पर्यंत माझे वजन कधीही ७० किलोपेक्षा जास्त झाले नाही. जरी मी उंच असलो तरी मी दिवसातून किमान ४० रोट्या खात असे.” या अभिनेत्याने गावात वाढलेल्या त्याच्या शारीरिक हालचाली आठवल्या. तो म्हणाला की, तो शेतात जाऊन हंगामी फळे आणि भाज्या खात असे. आम्ही ऊस, गाजर, पेरू किंवा कोणतीही हंगामी फळे आणि भाज्या खात असे.

जयदीप अहलावत तीन वेळा अर्धा लिटर दूध पीत असे

जयदीप अहलावत म्हणाला की, तो सकाळी चणे, बाजरीची रोटी किंवा मिस्सी रोटी खात असे. त्यात लस्सी, घरी बनवलेले बटर व चटणी असायची. तो म्हणाला, “त्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण करायचो. दुपारचे जेवण तयार असायचे. जर एखाद्याला भूक लागली, तर तो ते खाऊ शकेल ना; पण,तसे होत नसायचे. तो म्हणाला, दूध माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होता. मी दिवसातून किमान तीन वेळा अर्धा लिटर दूध प्यायचो. मग जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा आम्हाला ग्लासमध्ये दूध पिण्याची परवानगी नव्हती. आम्हाला ते तांब्यात प्यावे लागायचे. आणि ही एक सामान्य गोष्ट होती.”

जयदीप पार्ट्यांमध्ये जाऊनही घरी बनवलेले जेवण खातो

जयदीपने सांगितले की, त्याला मुंबईत येऊन १५-१६ वर्षे झाली आहेत; पण आजही तो घरी बनवलेले जेवण खातो. “मी १५-१६ वर्षांपासून मुंबईत आहे आणि मला अजूनही घरी बनवलेले जेवण आवडते. मी पार्ट्यांमध्ये जातो तेव्हाही मी घरी येतो, जेवण बनवतो, जेवतो आणि मग झोपतो.”