बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानच्या सिनेमातून पदार्पण करण्याची संधी जरीनला मिळाली. मात्र बॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास खडतर होता. ‘वीर’ या सिनेमातून जरीनने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. मात्र त्यानंतर ती फारशी चमकली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळवण्यासाठी जरीनला मोठे कष्ट घ्यावे लागले. बॉलिवूडमध्ये येण्याआधी जरीनला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीची संपूर्ण जबाबदारी जरीनवर आली होती. त्यानंतर जरीन खानला एका कॉल सेंटरमध्ये काम करावं लागलं. कॉल सेंटरमध्ये काम करून ती कुटुंबाचा सांभाळ करत होती. एका मुलाखतीत तिने खुलासा केला होता की वडिलांच्या निधनानंतर आई खूप चिंतेत होती. बहिणीचं शिक्षण सुरू होत. यावेळी जरीनने आईला आपण सर्व जबाबदारी पार पाडणार असल्याचं म्हणत दिलासा दिला होता.

 

युवराज सिनेमाच्या शूटिंगवेळी सलमानची नजर जरीन खानवर पडली. कतरिनाशी साम्य असलेल्या जरीना सिनेमासाठी विचारावं असं सलमानने त्याच्या टीमला सांगितलं. यानंतर ‘वीर’ या सिनेमासाठी जरीनला विचारण्यात आलं. अर्थातच सलमान खोनसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने जरीनने ती सोडली नाही.

‘वीर’ या सिनेमात सलमानसोबत झळकल्यानंतर जरीनला मोठी ओळख मिळाली. हा सिनेमा फारसा हीट ठरला नसला तरी जरीनच्या लूक्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर ती हाउसफुल 2, हेट स्‍टोरी 2, वजह तुम हो, अकसर 2, आणि 1921या सिनेमांमधून झळकली. मात्र सलमानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करूनही जरीना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. तसंच त्यानंतर तिला मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी देखील मिळाली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zareen khan birthday special fact worked in call center before bollywood entry kpw