बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन ही आता सामान्य बाब झालीय. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करून चाहत्यांचं मन जिंकलंय. ‘मैं हूं ना’ फेम जायद खान सुद्धा त्यांच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आलाय. अभिनेता जायद खाननं त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये त्याचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते देखील आश्चर्य झाले आहेत. या फोटोमध्ये त्याचं शरीर पहिल्यापेक्षा जास्त बल्की दिसून येतंय. त्याच्या नव्या लूकचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

अभिनेता जायद खान हा सोशल मीडियावर इतर सेलिब्रिटीं इतका सक्रिय नसतो. पण नुकतंच त्याच्या लेटेस्ट फोटोमुळे तो बराच चर्चेत आलाय. जायद खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक स्पोर्टी लूकमध्ये कॅप घातलेला एक फोटो शेअर केलाय. हा फोटो त्याने जीमममध्ये काढलेला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने भलीमोठी पोस्ट देखील लिहिलीय. त्याच्या आश्चर्यकारक बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्याने ह्रतिक रोशनचे आभार मानले आहेत. त्याच्या या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचं बहिण सुजैन खानने देखील भरभरून कौतुक केलंय.

या पोस्टमध्ये अभिनेता जायद खानने लिहिलंय, “सर्वांना शुभप्रभात…सूर्य पुन्हा उगवणार…त्यामूळे तुम्ही कधीही धैर्य नका सोडू…हार नका मानू…कधी कधी त्रास सहनशीलतेच्या पलिकडे जातो… मी हे अनुभवलंय…अनेकदा हा त्रास सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. पण जो सगळ्यात जास्त त्रास सहन करतो आणि एक मजबूत आणि निर्भीड व्यक्तीच्या रुपातून समोर येतो अशा व्यक्तींच्या पाठीशी देव कायम असतो. खरं तर आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं, पण ते असलंच पाहिजे हे देखील गरजेचं नसतं.”

ह्रतिक रोशनचे मानले आभार

या पोस्टमध्ये लिहिताना जायद पुढे म्हणाला, हा कठिण काळ सुरूये आणि यात आपण एकमेकांच्या चुकांना माफ करण्याची हीच योग्य वेळ आहे. या कठिण काळात पॅरासाईटपेक्षा वॉरियर्स बनण्याची खरी गरज आहे. हे मान्य आहे की, गेले दोन वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप अवघड गेले आहेत. पण या काळात स्वतःला जागं करून आपल्या मनातली निराशा झाडून एकत्र येत या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावत एकत्र पुढे जायचंय आणि देवावर विश्वास ठेवा. प्रामाणिकपणाने स्वतःला एक संधी देण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना माहितेय आपण हे करू शकतो. मी यासाठी ह्रतिक रोशनचे आभार मानतो. तुम्ही अशीच प्रगती करत रहा.”

घटस्फोटानंतरही ह्रतिक-सुजैनचं चांगलं नातं

अभिनेता जायद खान हा ह्रतिक रोशनची पत्नी सुजैन खानचा भाऊ आणि संजय खान यांचा मुलगा आहे. त्याच्या या फोटोवर बहिण सुजैन खानने कमेंट करत त्याचं कौतुक केलंय. ‘लुकिंग फेब’ असं तिने या कमेंटमध्ये लिहिलंय. ह्रतिक रोशन आणि सुजैन खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्यातील नातं अजूनही चांगलं आहे. अभिनेता जायद आणि त्याची पत्नी मलायका यांच्यासोबत ते दोघे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत.

गेल्या ६ वर्षापासून बॉलिवूडपासून दूर

जायद खानने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनेता शाहरूख खानच्या ‘मैं हूं ना’ व्यतिरिक्त ‘शब्द’, ‘दस’, ‘कॅश’, ‘स्पीड’, ‘मिशन इस्नाबुल’, ‘युवराज’, ‘ब्लू’, ‘अंजाना-अंजानी’ आणि ‘शराफत गई तेल लेने’ सारख्या चित्रपटांतून झळकला. त्याचं बॉलिवूडमधलं करिअर म्हणावं तितकं काही खास ठरलं नाही. त्यानंतर गेल्या ६ वर्षापासून तो बॉलिवूडपासून दूर राहिला.