मुंबई : धारावी येथे १० वर्षांच्या मुलावर दोघांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी २४ वर्षीय आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींनी मुलाला मारहाण करून त्याच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा – अंधेरीत गॅसगळतीमुळे दुकानांना आग, चारजण जखमी

हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनाच्या नावाखाली १० जणांची फसवणूक, ३२ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्ह दाखल

पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३७७, ३२३, ५०६ व ३४ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक आरोपी २४ वर्षांचा, तर दुसरा १४ वर्षांचा आहे. तक्रारीनुसार हा प्रकार १ मे रोजी घडला. पीडित मुलगा खेळण्यासाठी गेला असता दोन्ही आरोपींनी त्याला शौचालयात नेले. त्यानंतर मारहाण करून दोघांनीही पीडित मुलावर अत्याचार केला. त्यानंतर २४ वर्षीय आरोपीने ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर जबरदस्ती केली. घाबरलेल्या मुलाने हा प्रकार आईला सांगितला. आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून २४ वर्षीय आरोपीला अटक केली. त्यानंतर याप्रकरणी १४ वर्षीय आरोपीची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली.