मुंबई : आंब्याच्या झाडावरून पडून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी चेंबूर परिसरात घडली. याबाबत चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मुंबई : क्षयरोग रुग्णालयात १० नवीन अतिदक्षता खाटा

हेही वाचा – मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ दिसली संशयास्पद बोट, दोन पाकिस्तानी नागरिक बोटीवर असल्याचा संशय, अलर्ट जारी

काही वर्षांपूर्वी आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे प्रेम गवळी (१४) आजीसोबत चेंबूरच्या कोकण नगर परिसरात वास्तव्यास होता. प्रेम शुक्रवारी सायंकाळी मित्रांसोबत भक्ती भवन परिसरात फिरायला गेला होता. आंबे काढण्यासाठी तो तेथील एका झाडावर चढला होता. त्याच वेळी तोल जाऊन तो झाडावरून खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. आसपासच्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 14 year old boy died after falling from a mango tree in chembur area mumbai print news ssb