मुंबई: न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही मुंबईतील अनेक दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे आक्रमक भूमिक घेत मनसेच्या कायर्कर्त्यांनी बुधवारी ट्रॉम्बे परिसरातील एका हॉटेलच्या फलकाची तोडफोड केली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमधील दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक ठळक मराठी भाषेत लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक दुकानदारांनी या मुदतीत मराठी भाषेतील नामफलक लावलेले नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दुकानांवर मराठी भाषेतील नामफलक लावावे, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले होते. मात्र या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – मुंबई : कोळीवाडे, गावठाणांच्या विस्तारित सीमा लवकरच अधिकृत होणार! वाढीव चटईक्षेत्रफळाचा निर्णय प्रलंबित

हेही वाचा – मुंबई : चेंबूरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझावर महानगरपालिकेचा हातोडा

ट्रॉम्बे परिसरातील ‘कॅफे कॉफी डे’समोर मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले. यावेळी कॅफेच्या फलकाची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी ५ ते ७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against mns workers in the case of vandalizing non marathi boards mumbai print news ssb