मुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला | A four year old boy who was going to play garba was attacked by a leopard mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

आरेतील आदर्शनगर येथे राहणारा चार वर्षीय मुलगा वडिलांबरोबर गरबा खेळण्यासाठी जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला.

मुंबई : गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या चार वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला
संग्रहित छायाचित्र

आरेतील आदर्शनगर येथे राहणारा चार वर्षीय मुलगा वडिलांबरोबर गरबा खेळण्यासाठी जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर त्याला तत्काळ ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी नेण्यात आले. घटनास्थळी बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> उपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच!

आदर्शनगर येथील ओल्ड हिल क्वार्टर येथे राहणारा चार वर्षीय हिमांशू यादव वडिलांबरोबर सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गरबा खेळण्यासाठी जात होता. त्यावेळी अचानकपणे बिबट्याने हिमांशूवर उडी मारून हल्ला केला. त्याच्या वडिलांनी आरडाओरड केल्यावर बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात हिमांशू जखमी झाला. यामुळे आरेतील रहिवाशांची भीतीने गाळण उडाली आहे. आरे कॉलनीतील बिबट्याचा मुक्तसंचार लक्षात घेता पाड्यांतील नागरिकांनी जागरूकपणे पहारा सुरू केला आहे. दरम्यान, कोणत्या बिबट्याने हल्ला केला आहे याबाबत माहिती घेण्यासाठी घटनास्थळी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गस्ती पथक देखील तैनात केले आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई: शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहन सज्ज ; एकट्या औरंगाबादमधून ३५० गाड्या आरक्षित

संबंधित बातम्या

तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्याच्या निर्णयाला आव्हान; केंद्र-राज्याचे धोरणच नसल्याने आदेशांची अंमलबजावणी अशक्य
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना
राऊत यांच्याविरोधातील ‘ईडी’च्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार
राज्यात अभियांत्रिकीच्या दीड लाख जागा रिकाम्या
भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज, पुन्हा तुरुंगात रवानगी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“कश्मीर पंडितांच्या…” IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’चा ‘वल्गर’ उल्लेख केल्यानंतर चित्रपटातील अभिनेता संतप्त
पुण्यात १७०० चार्जिंग पाॅईंट
सचिन तेंडुलकरची लेक सारा करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट? फोटो व्हायरल
पुणे: अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वगळले
करोनामुळे मृत झालेल्या कर्जदारांची माहिती मागवली; सहकार विभागाला उशिरा जाग