मुंबईः विक्रोळी परिसरात प्रतिबंधात्मक गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारांना मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्कसाईट पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली. तक्रारदार पोलीस हवालदार दीपक फुफाणे (४८) पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यारत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार फुफाणे परिसरात प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. त्यांना अभिलेखावरील आरोपींची तपासणी करण्यास सांगण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असलेला शोहेब उर्फ बल्ली मौलानी शेख याची चौकशी करण्यासाठी ते गेले. त्यावेळी विक्रोळी येथील सोमेश्वर नगर परिसरातील पोपटेस्ट हॉटेलजवळ शेख असल्याचे त्यांना समजले. फुफाणे तेथे गेले व त्यांनी आरोपीला ओळखपत्र दाखवले. त्यावेळी आरोपी शेख आणि त्याचा साथीदार युसुफ ऊर्फ पापा शेख यांनी फुफाणे यांना मारहाण केली. या  घटनेनंतर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शोहेब शेखला पोलिसांनी अटक केली. युसुफ शेखविरोधातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी शोहेबविरोधात यापूर्वी अंमलीपदार्थ प्रतिबंथक कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A patrolling policeman was assaulted in vikhroli mumbai print news ysh