गोरेगाव पूर्व येथे खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या ४६ वर्षीय आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. पीडित मुलींपैकी एकीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- विश्लेषण: भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालय आरक्षणाचा वाद काय?

पीडित मुली आठ व १० वर्षांच्या आहेत. पीडित मुली बुधवारी इमारतीच्या आवारात खेळत होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आला. मुली खेळत असताना आरोपी तेथे उभा होता. त्यानंतर मुलींकडे बघून त्याने घृणास्पद कृत्य करण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे मुली घाबरल्या. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. अखेर एका पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी गोरेगाव येथील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused of molesting two minor girls arrested mumbai print news dpj