“१०० व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन शिवसेना भवनात झेंडावंदन करतील, हे लिहून ठेवा”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा शिवसेना भवनामध्ये झेंडावंदन केल्याची आठवणही त्यांनी करुन दिली.

“१०० व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन शिवसेना भवनात झेंडावंदन करतील, हे लिहून ठेवा”
प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं विधान

आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी १५ ऑगस्टनिमित्त शिवसेना भवनामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर एक विधान केलं आहे. त्यांच्या इतर विधानांप्रमाणे हे सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंबद्दल एक भाकित केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते काल शिवसेना भवनामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रमा पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील तेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीमधून येऊन शिवसेना भवनात ध्वजारोहण करतील असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

किशोरी पडेणेकर यांनी स्वातंत्र्यदिनाच्या ५० व्या वर्षी बाळासाहेब ठाकरेंनी सेनाभवनामध्ये ध्वजारोहण केलं अशी आठवणही ठाकरे कुटुंबाबद्दल बोलताना करुन दिली. तसेच आज उद्धव ठाकरेंनी ध्वजारोहण केलं असून भविष्यात दिल्लीमध्येही शिवसेनेची ताकद दिसेल असं सूचित करणारं विधान त्यांनी केलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील तेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीतून मुंबईत येऊन ध्वजारोहण करतील असा विश्वास किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >>  विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

“आज देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. अमृतमहोत्सव करताना अडचणी तेवढ्याच आहेत. अडचणी फारशा सुटलेल्या नाहीत. स्वातंत्र्यदिनाला ५० वर्ष पूर्ण झाली तेव्हा याच सेनाभवनात बाळासाहेबांच्या हस्ते झेंडावंदन झालं होतं. आज ७५ वर्षानिमित्त उद्धव ठाकरेंच्या हस्ते इथे झेंडावंदन झालं. १०० वर्ष पूर्ण होणार तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतून येऊन झेंडावंदन करणार हे लिहून ठेवा,” अशा शब्दांमध्ये किशोरी पेडणेकरांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास व्यक्त केला. सध्या त्यांचं हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबईत बेस्टसाठी ‘स्वतंत्र मार्गिके’चा विचार ; झटपट प्रवासासाठी पुन्हा एकदा ‘बीआरटीएस’चा पर्याय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी