भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ विधिमंडळात राष्ट्रवादीने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली असली तरी विधिमंडळ नेते अजित पवार हे सभागृहात उपस्थित नव्हते. अजितदादा विधान भवनाकडे गेले दोन दिवस फिरकलेच नाहीत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
भुजबळांच्या अटकेनंतर अजितदादांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दूध महासंघाच्या निवडणुकीमुळे अजित पवार हे गेले दोन दिवस सभागृहात उपस्थित नव्हते, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. सुनील तटकरे मात्र विधान परिषदेत उपस्थित होते.
अजितदादांच्या अनुपस्थितीबद्दल मग आमदारांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली.
First published on: 16-03-2016 at 04:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar not attend protest session on support of bhujbal in vidhyabhavan