Premium

खंडणी प्रकरणात सचिन वाझे यांना जामीन

मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.

sachin vaze
सचिन वाझे

मुंबई : मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरदंडाधिकाऱ्यांनी जामीन नाकारल्याने वाझे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. यु. हाके यांनी वाझे यांची जामिनाची मागणी मान्य केली. आपल्यावरील दाखल गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरवण्यात आल्यास अधिकाधिक तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु कच्चा कैदी म्हणून या शिक्षेच्या कालावधीच्या अध्र्याहून अधिक काळ आपण अटकेत आहोत. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) तरतुदींनुसार आपण जामिनासाठी पात्र असल्याचा दावा वाझे यांनी जामिनाची मागणी करताना केला होता.  सीबीआयने वाझे यांच्या अर्जाला विरोध केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bail to sachin vaze in extortion case mumbai print news ysh

First published on: 30-09-2023 at 01:51 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा