महाशिवरात्रीच्या निमित्त शुक्रवारी मुंबईच्या काही भागात प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्यावतीने अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कान्हेरी गुंफा येथील पुरातन लेण्यांना भेट देणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसमार्ग क्रमांक १८८ मर्यादित या मार्गावर एकूण सहा जादा बस चालवण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण : पॅरोलची मुदत संपल्यानंतर कारागृहात हजर न झालेल्या आरोपीला पकडण्यात यश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफादरम्यान शुक्रवारी सकाळी ११ पासून सायंकाळी ७.३० पर्यंत एकूण सहा जादा बसगाड्या चालिवण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफादरम्यान नियमित बससेवा कार्यरत राहतील. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उ‌द्यान प्रवेशद्वार, एलोरा चौकी (बोरिवली स्थानक-पूर्व) तसेच कान्हेरी गुंफा येथे बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण मुंबईमधील बाबुलनाथ येथील शिव मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७  दरम्यान बसमार्ग क्र. ५७, ६७ आणि १०३ या बस मार्गांवर एकूण सहा जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. बाबुलनाथ मंदिर येथे भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक अधिकारी व बस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भाविकांनी या जादा बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best to run additional buses on the occasion of mahashivratri mumbai print news zws