नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असताना आणि विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्काना उधाण आले आहे. भुजबळ यांनी मात्र ही भेट राजकीय नव्हती, तर कौटुंबिक होती, असे स्पष्ट केले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
महाराष्ट्र सदन व अन्य काही प्रकरणांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीत अडकलेले छगन भुजबळ रविवारी सकाळी सपत्निक दादर येथील राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी दाखल झाले. सुमारे अडीच तास भुजबळ राज यांच्या घरी होते.
First published on: 07-12-2015 at 01:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhujbal raj meet