भाजपा नेत्याने रश्मी ठाकरेंना ‘राबडी देवी’ म्हटल्यानंतर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले “सौभाग्यवतींना…”

तुम्ही तर आम्ही एखादं ट्वीट केलं तरी जेलमध्ये टाकत आहात; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. शिवेसनेने याविरोधात आक्रमक पवित्रा घेत सायबर सेलकडे तक्रार केली होती. यानंतर मुंबई पोलीस क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने जितेन गजारिया यांना समन्स बजावलं होतं. जितेन गजारिया यांनी बीकेसमध्ये पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला होता. दरम्यान फडणवीसांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी युती, हिंदुत्व, नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, राम मंदिर असे अनेक उल्लेख करत उद्धव ठाकरेंना इतिहासाची आठवण करुन दिली. दरम्यान संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी रश्मी ठाकरेंसंबंधी भाजपा नेत्याने केलेल्या ट्वीटचा उल्लेख करत नाराजी जाहीर केली.

भाजपा नेत्याने रश्मी ठाकरेंना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ म्हणल्याने किशोरी पेडणेकरांचा संताप; म्हणाल्या “कांगारुसारखे उडी…”

संजय राऊत यांनी भाजपावर ईडी, सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप करताना त्यांना बाजूला ठेवून सामोरं येण्याचं आव्हान दिलं. यासंबधी बोलताना ते म्हणाले की, “चोऱ्या कराल तर ईडी, सीबीआय कारवाई करणारच. तुम्ही तर आम्ही एखादं ट्वीट केलं तरी जेलमध्ये टाकत आहात. राबडी देवी ही काय शिवी आहे? पण सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं म्हणून पुण्याचे २५ पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घऱात जात आहेत. आम्ही त्यांचं समर्थन नाही केलं. त्यामुळे हा रडीचा डाव आहे”.

नेमकं काय झालं होतं ?

भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले होते. जितेन गजारिया यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या ट्वीटवरुन सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना नोटीस पाठवत जबाब नोंदवून घेतला. हे ट्वीट नंतर जितेन गजारिया यांनी डिलीट केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadanvis jiten gajaria maharashtra cm uddhav thackeray wife rashmi thackeray rabri devi sgy

Next Story
“सावरकर आणि हिंदू महासभेची ‘ही’ कृती म्हणजे ब्रिटिशांसोबत संधान बांधणं”, जावेद अख्तरांनी ट्विट केलं सुभाषचंद्र बोस यांचं पत्र
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी