गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या निकालाकडे नजर टाकल्यास एक्झिट पोलचे अंदाज जवळपास खरे ठरल्याचे चित्र आहे. मात्र, यानिमित्ताने पुण्यातील एका फसलेल्या एक्झिट पोलचीही चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार संजय काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणामुळे भाजप गुजरात निवडणुकीत पराभूत होईल. अन्य पक्षांशी हातमिळवणी करूनही भाजपला तेथे सत्ता मिळविता येणार नाही, असा दावा काकडे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, आज गुजरातचे निकाल समोर आल्यानंतर काकडे यांना पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करावी लागली. गुजरातमध्ये यंदा मोदींचा करिष्मा चालेल, असे मला वाटले नव्हते. पण मोदींनी पुन्हा ही किमया साधली, असे काकडे यांनी म्हटले.

‘लांब हातांची’ माणसं..

‘भाजप गुजरातमध्ये कित्येक वर्षांपासून सत्तेत होता. यंदा परिस्थिती बदलली आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. तसेच मुस्लीम समाजातील मतदारही भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना गुजरातमध्ये लक्ष केंद्रित करता आले नाही. त्यातच पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल याची सीडी हा मुद्दाही चुकीच्या वेळी पुढे आणण्यात आला आहे. निवडणुकीच्या कालावधीत विकासाच्या मुद्दय़ावर भर देण्यात आला नाही. या सर्व बाबी विचारात घेता निवडणूक जिंकणे अडचणीचे ठरेल,’ असे काकडे यांचे म्हटले होते. मात्र, आजचा निकाल पाहता संजय काकडे तोंडघशी पडल्याचे दिसत आहे.

भाजपमध्ये कोणाचीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही-बापट

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pune mla sanjay kakade prediction about gujrat election 2017 went wrong