मुंबईः आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात दारूच्या बाटल्यांसह एका महिलेला कुरार पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय साबुसिद्धीकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे.जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही समाज माध्यमांद्वारे प्रचार केल्याच्या आरोपाखाली डीएन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालाड पूर्व येथील कुरार आप्पा पाडा परिसरात अंजली पाष्टे (५३) या महिलेला दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून व्हिस्कीच्या चार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी महिलेला सीआरपीसी कलम ४१(१) (अ) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. भरारी पथकाने केलेल्या कारवाईत महिला दारूच्या बाटल्यांसह सापडली होती.

हेही वाचा – मुंबई : मतदान यादी क्रमांकामुळे मतदारांमध्ये संभ्रम

हेही वाचा – राज्यात आज अंतिम टप्पा; मुंबई, ठाणे, नाशिकसह १३ मतदारसंघांत मतदान, २६४ उमेदवार रिंगणात

डोंगरी इमामवाडा येथे साबुसिद्धीकी या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मदतान करण्याचे आवाहन करणारे पोस्टर सापडले. याप्रकरणी सर जे.जे. पोलिसांनी अब्दुल रज्जाक मणियार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय प्रचार कालावधी संपला असताना प्रचार करत असताना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रचार करत असताना आढळला. याप्रकरणी डीएन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहसिन हैदर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases have been filed at various places for violating the code of conduct in mumbai mumbai print news ssb