मुंबई: केंद्रसरकारच्या उप गुप्तचर विभागाला पनवेलमधील आसूडगाव येथील चार हेक्टर जमीन देण्यात आली आहे. शासकीय गायरानातील ही जमीन गुप्तचर विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थानांसाठी देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या जमिनीवर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या उप गुप्तचर विभागाला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवा-निवासस्थाने बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आसुडगाव येथील सर्व्हे नंबर ३३ पैकी ४ हेक्टर जमीन रेडीरेकनर दरानुसार येणाऱ्या किंमतीच्या ५० टक्के आकारून देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जमीन उपसंचालक, सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो, भारत सरकार, मुंबई विभाग यांना भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने आणि कब्जाहक्काने देण्यात येणार आहे. यासाठी काही अटी व शर्तीही घालण्यात आल्या आहेत.