पुण्यात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे ‘टिलीमिली’ या सह्य़ाद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण १३ जुलै ते २३ जुलै काळात बंद ठेवावे लागले. त्यामुळे मालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार ३ ते ३१ ऑगस्ट (१५ ऑगस्ट वगळून) इयत्ता आठवी (सकाळी ७.३० ते ८.३०), सातवी (सकाळी ९ ते १०), सहावी (सकाळी १० ते ११), पाचवी (सकाळी ११.३० ते १२.३०) या प्रमाणे मालिका पाहता येईल. तर १ ते २८ सप्टेंबर दरम्यान इयत्ता चौथीसाठी (सकाळी ७.३० ते ८.३०), तिसरीसाठी (सकाळी ९ ते १०), दुसरीसाठी (सकाळी १० ते ११), पहिलीसाठी (सकाळी ११.३० ते १२.३०) अशी वेळ असेल. प्रत्येकी एक तासात संबंधित इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल. रविवारी मालिका प्रसारित होणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2020 रोजी प्रकाशित
‘टिलीमिली’ मालिकेच्या वेळापत्रकात बदल
रविवारी मालिका प्रसारित होणार नाही
Written by लोकसत्ता टीम

First published on: 04-08-2020 at 00:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes to tillimilis series schedule abn