येत्या २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी येत्या चोवीस तासात चांगला पाऊस पडेल असं वातावरण तयार झाल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हाचे चटके महाराष्ट्रासह देशाला बसत आहेत. अशात अपेक्षा आहे ती चांगल्या पावसाची. यंदा एकूण सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या पावसाच्या सरी कोसळल्यानं काही अंशी दिलासा मिळेल. तसंच शेतीसाठीही हा पाऊस पूरक ठरणार आहे. आज नागपुरात आणि ठाण्यात पावसाच्या सरी बरसल्या. मुंबईतही हलक्या प्रमाणात पाऊस झाला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2017 रोजी प्रकाशित
राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल, २४ तासात सरी कोसळणार
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोसळणार जलधारा
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-06-2017 at 17:59 IST
TOPICSबातमीNewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraमान्सून अपडेटMonsoon Update
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conditions are favourable for further advance of monsoon