आदर्श सोसायटी घोटाळा
दक्षिण मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याशी संबंधित दाखल विविध याचिकांवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी अखेर राखून ठेवला. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर आदर्श घोटाळ्याशी संबंधि्ात विविध याचिकांवर नियमित सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी या याचिकांवरील सुनावणीसाठी या खंडपीठाची विशेष नियुक्ती केली होती.