मुंबई- सागरी मार्गावर (कोस्टल रोड) भरधाव वेगाने जाणार्या मद्यपी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी लोखंडी कुंपण तोडून थेट पाण्यात गेली. त्याला वाचविण्यात यश आले आहे. रविवारी रात्री सागरी मार्गाजवळील वरळी येथे ही घटना घडली. या धडकेत सागरी मार्गाच्या लोखंडी कठड्याचेही नुकसान झाले.

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ११ च्या सुमारास सागरी किनारा मार्गावरून फरगोश बत्तीवाला (१९) हा तरुण भरधाव वेगाने वाहन चालवत होता. तो महालक्ष्मी येथून वरळीचय दिशेने चालला होता. वरळीनजीक पुलावर त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी कार संरक्षक कठड्याला जाऊन आदळली. त्याच्या गाडीचा वेग प्रचंड होता. त्यामुळे गाडी संरक्षक कठडा तोडून पाण्यात पडली.

एअरबॅग्ज उघडल्याने जीव वाचला

मात्र कठड्याला गाडी धडकल्याने गाडीतील एअरबॅग उघडल्या आणि कार पाण्यात पडून तो तरंगत होता. त्यामहाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान तैनात होते.पांडुरंग काळे आणि विकास राठोड यांनी त्वरित समुद्रात उडी मारून चालकाचा जीव वाचवला आणि दोरीच्या मदतीने त्याला बाहेर काढले. ३० फूट उंचीवरून ही गाडी पाण्यात पडली होती, असे पोलिसांनी सांगितले.

चालकावर गुन्हा दाखल

या अपघातामध्ये किरकोळ जखमी झालेल्या बत्तीवाला याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. या बत्तीवाला याच्याविरोधात मद्यपान करून भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि सार्वजनिक मालमत्तेच नुकसान केल्याप्रकऱणी भारतीय न्याय संहिता चे कलम २८१, १२५, ३२४(३), ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यापूर्वीचे अपघात

सागरी मार्गाचा (कोस्टल रोड) भुयारी मार्ग अंशतः सुरू झाल्यापासून (फेब्रुवारी २०२५) काही महिन्यातच अनेक अपघात झाले आहेत..जून २०२५ मध्ये, एका सरकारी अधिकाऱ्याची गाडी भुयारी मार्गात उलटली होती. चालकाने पाण्यातल्या चिखलावर अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडी घसरून उलटली,

२२ सप्टेंबर २०२५ रोजी, एका महागड्या लॅम्बोर्गिनी कारने दुभाजकावर धडक दिली होती.मार्च २०२५ मध्ये, भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या एका २४ वर्षीय बीएमडब्ल्यू चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५- सागरी मार्गावरील वरळीच्या बाजूला दोन पोलीस गस्तीवर होते. सकाळी साडेसातच्च्या सुमारास एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार (वय ५२) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या सहकारी हवालदार ऋद्धी पाटील (वय ३५) जखमी झाल्या.