तंत्रज्ञानाच्या मदतीने ५९ वर्षीय व्यक्तीचे नग्न छायाचित्र बनवून त्याच्याकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने संबंधीत छायाचित्र मित्र व कटुंबातील व्यक्तींना पाठवणाची धमकी देऊन तक्रारदाराकडून खंडणीची रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बेस्टच्या नोटीसवर कंत्राटदाराचे मौन; मिनी बसची संख्या रोडावली

खार पश्चिम येथील रहिवासी असलेल्या तक्रारदारांचा चेहरा नग्न शरीरावर लावून आरोपीने एक चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत तक्रारदाराला पाठवून खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी आरोपीने दिली. हा प्रकार ४ ऑक्टोबरला घडल्यानंतर तक्रारदारांनी काही रक्कम आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर जमा केली. आरोपीने पुन्हा पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. रक्कम न दिल्यास मित्र व नातेवाईकांना चित्रफीत दाखवण्याची धमकी दिली. तक्रारदाराने आतापर्यंत ३१ हजार रुपये आरोपीला दिले. मात्र वारंवार पैशांची मागणी होत असल्यामुळे अखेर त्यांनी याप्रकरणी खार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

हेही वाचा- Mumbai Rains: ठाण्यात वीजांच्या कडकडाटसह तुफान पाऊस; मुंबई, डोंबिवली, नवी मुंबईतही कोसळला, तासभर जोरदार बरसणार

प्राथमिक तपासानुसार आरोपीने चार विविध क्रमांकावरून तक्रारदाराशी दूरध्वनी व व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला आहे. याप्रकरणी सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extortion demand by creating fake photograph mumbai print news dpj
First published on: 07-10-2022 at 16:31 IST